पुणे

पुण्यात यंदा प्रथमच पारा चाळिशीच्या वर 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या वर उसळला. पुण्यासह राज्यातील दहा शहरांमध्येही उन्हाचा चटका वाढला असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदवण्यात आले. राज्यात अमरावती येथे सर्वाधिक म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस तपमान नोंदले गेले. राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याने उन्हाचा चटका अजून वाढेल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

मध्य भारत, उत्तर कर्नाटक, दक्षिण तेलंगण येथे कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्येही कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा वाढला आहे. पुण्यात यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्याने कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

शहरात सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढलेला होता. दुपारी अतिनील किरणांचा निर्देशांक दोनपेक्षा जास्त झाला होता. उन्हाच्या वाढत्या चटक्‍यामुळे लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता यासह पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ कमी झाली होती. 

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, त्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा सोमवारी विरून गेला होता. परिणामी राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

प्रमुख शहरांतील तापमान (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये) 
पुणे - 40.2 
जळगाव - 40.6 
मालेगाव - 41 
सोलापूर - 40.7 
सांताक्रूझ - 40.3 
परभणी - 41.4 
अकोला - 41.4 
अमरावती - 41.6 
चंद्रपूर - 40.2 
यवतमाळ - 40 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: स्टार्कने दिल्लीला दिला दुसरा मोठा धक्का! धोकादायक फ्रेझर-मॅकगर्कला धाडलं माघारी

SCROLL FOR NEXT