50138762_309725646553455_20.jpg
50138762_309725646553455_20.jpg 
पुणे

मासा गळ्यात अडकला...अन् श्वास बंद झाला

ज्ञानेश्वर रायते

बारामती : साडेचार महिन्यांची मुलगी तोंडातून लाळ गाळते म्हणून जिवंत मासा तोंडातून फिरवला तर लाळ गाळायचे बंद होईल, अशी घरगुती उपचाराची अपुरी व अर्धवट माहिती मिळाल्याने मावशीने मुलीच्या तोंडात जिवंत मासा फिरवला. पण, गुळगुळीतपणामुळे मासा निसटून थेट अन्ननलिकेत जाऊन अडकला. अन् त्या चिमुकलीची आयुष्याशी लढाई सुरू झाली.शिर्सूफळहून बारामतीला आणेपर्यंत तिचा श्वासही बंद झाला. पण बारामतीतील देवदूतांनी तिला जीवन संजीवनी दिली.

बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा, कान, नाक घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने व भूलतज्ज्ञ अमरसिंह पवार यांच्या पथकाने दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान व अत्यंत युध्दपातळीवर केलेल्या शस्त्रक्रियामुळे आज ऊस तोड मजूराच्या चिमुकल्या मुलीचा जीव अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आला. 

मूळच्या चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बापू माळी याचे कुटुंब भिमा पाटस कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी येथे आले आहे. ते तालुक्यातील शिर्सूफळ येथे असून आज दुपारी बापू यांची चार महिन्यांची मुलगी अनू ही जन्मल्यापासून तोंडातून लाळ गाळते. तिच्या मावशीने कोणीतरी सांगितले म्हणून अर्धवट माहितीतून पाण्याच्या पाटचारीत मासा शोधला. बोटुकलीच्या आकाराचा जिवंत मासा तिने आणून तो त्या लहानग्या अनुच्या तोंडातून फिरवायचा प्रयत्न केला, मात्र मासा बुळबुळीत असल्याने तो निसटून अनूच्या थेट अन्ननलिकेतून श्वासनलिकेपर्यंत गेला आणि तिचा जीव घुसमटला. हे पाहताच बापू माळी याने शेजारील कोणाचीतरी दुचाकी घेऊन बारामतीला धाव घेतली. 

येथील डॉ. मुथा यांच्या दवाखान्यात धावतच चिमुकल्य़ा अनुला आणण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा श्वास बंद झाला होता. डॉ. राजेंद्र मुथा, सौरभ मुथा यांनी तिच्या छातीवर जीवन संजीवनी (सीपीआर) क्रिया करण्याचा प्रयत्न करीत हृदय पुन्हा चालू करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर लागलीच तिच्यावर दुर्बिँणीच्या सहाय्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून तो मासा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया दहा मिनीटे चालली. बाळाचा श्वास व्यवस्थित सुरू होईपर्यंत झटके येत होते. झटके कमी होण्याची इंजेक्शन देऊन तिची प्रकृती स्थिर झाली तेव्हा डॉक्टरांनी सुटकेचा श्वास टाकला. चिमुकलीच्या आईवडीलांना तर डॉक्टरांचे आभार कसे मानावेत हेच सुचत नव्हते, त्यांनी डोळ्यातील पाण्यानेच डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यानच्या काळात मात्र दवाखान्यात आलेले इतर पालक मात्र आपल्या मुलाच्या उपचारापेक्षा ती मुलगी वाचली पाहिजे म्हणून प्रार्थना करीत होते. डॉक्टरांनी कमी कालावधीत चिमुकलीचे प्राण वाचविल्याची माहिती परिचारिकांनी बाहेर येऊन सांगताच पालकांनी देखील अगदी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. बहिणाबाईंनी जगणं, मरणं एका श्वासाचं अंतर असं लिहून ठेवलं. पण बारामतीत जगण्याचा धागा डॉक्टरांनी असा शिवला की हे अंतर शिर्सूफळ- बारामतीच्या वीस किलोमीटरपेक्षा कोसो मैल दूर असल्याचा प्रत्यय आला. 

दुर्दैवाचे दशावतार...आणि माणूसकीचा सांगावा..
दुर्दैवाचे दशावतार असे की, ''चिमुकलीला घेऊन धावत निघालेल्या बापू माळी यांना दुचाकी मिळाली, मात्र शिर्सूफळच्या बाहेर येताच त्या दुचाकीतील पेट्रोलच संपले. दुचाकी बंद पडली. पोटची पोरगी जिवाच्या आकांताने तडफडते म्हटल्यावर बापाचा जीवही तगमगून मदतीसाठी त्याने टाहो फोडला. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या स्कूल बसच्या चालकाने पाहीले आणि त्याने क्षणाचाही विचार न करता माणूसकीची गरज म्हणून त्याने मदत केली. त्याने मदत केली नसती तर? आणि डॉक्टरांनीही तत्परतेने उपचार केले नसते तर? माशाने नाही, तर एका अंधश्रध्देने बाळाचा जीव घेतला असता या जाणीवेने बापू माळी देखील निःशब्द झाले. बारामतीत एका जगण्याची लढाई अनेकांनी अनुभवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : सीएसकेची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT