crime news
crime news sakal
पुणे

सावकाराने उकळले एक लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपये; दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

व्याजदर दिलेल्या एक लाख रुपयांच्या बदल्यात चार लाख ८६ हजार रुपये वसूल केल्यानंतरही ४० हजार रुपयांची मागणी.

पुणे - व्याजदर दिलेल्या एक लाख रुपयांच्या बदल्यात चार लाख ८६ हजार रुपये वसूल केल्यानंतरही ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सावकरासह त्याच्या हस्तकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावकार रवी नरसिंग पवार (वय ४२, रा. लक्ष्मीनगर सेंट पॅट्रिक टाऊन जवळ, हडपसर) आणि त्याचा साथीदार अशोक वसंत ठाकरे (वय २७, रा. हडपसर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार यांनी याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे अर्ज दाखल केला होता. त्याची चौकशी करून खंडणी विरोधी पथक दोनने ( गुन्हे शाखा) ही कारवार्इ केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जदार व त्यांचा मित्र या दोघांनी मिळून पवार याच्याकडून मे ते डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये एक लाख रुपये प्रति महिना १५ टक्के व्याज दराने घेतले होते. त्या एक लाख रुपयांच्या मोबदल्यात अर्जदार यांनी तीन लाख ३० हजार रुपये रोख स्वरूपात आणि एक लाख ५६ हजार ऑनलाइन असे एकूण चार लाख ८६ हजार रुपये दिले होते. मात्र त्यानंतरही आरोपींनी अर्जदार यांच्या मुलाला उचलून घेवुन जाऊन त्याचे हातपाय तोडून टाकण्याची व अर्जदार यांना जीवे ठार मारुन टाकण्याची धमकी देवून आणखीन मुद्दल व व्याज अशी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे अर्जदार यांनी तक्रारी अर्ज दिलेला होता. खंडणी विरोधी पथक दोनचे पुणे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलिस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराज, सचिन अहिवळे आणि अमोल पिलाणे यांनी ही कारवार्इ केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT