पुणे

लोकसभेसाठी काँग्रेसकडून पाच जण इच्छुक 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे, अनंतराव गाडगीळ यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेस ही नावे पुढील आठवड्यात प्रदेश कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत सादर करणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहराच्या जागेवर दावा केलेला असतानाच पुणे सोडणार नसल्याचे शहर कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण तसेच केंद्रीय नेत्यांकडेही म्हटले आहे. लोकसभा निवडणुका पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पार पडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसकडून मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे. मुंबई येथे प्रदेश कॉंग्रेसची बैठक 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. या बैठकीत मतदारसंघातील पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांचे संघटन आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. 

यात उमेदवार कोणताही असो, त्याचे एकीने काम करायचे आणि त्याला निवडून आणण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला. या वेळी मोहन जोशी, अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे यांनी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, आमदार अनंत गाडगीळ यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे ही नावे प्रदेश कॉंग्रेसकडे पाठविण्याचा निर्णय शहर कॉंग्रेसने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री सुरेश कलमाडी यांच्या नावाची चर्चा रंगली होती. 

उमेदवार क्‍लबमध्ये कसा ठरतो? 
लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी शहर कॉंग्रेसने कॉंग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यायला हवा होता. एखाद्या क्‍लबमध्ये चार भिंतींमध्ये मोजकेच लोक उमेदवार कसा निश्‍चित करू शकतात, असा प्रश्‍न पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आहे. पक्षाची निष्ठा, सातत्य, लोकांशी असलेला संपर्क यांचा विचार हवा. यापूर्वी ज्यांना पक्षाने खूप काही दिले आणि ज्यांनी निवडणुकांत सपाटून मार खाल्ला, अशांचा लोकसभा निवडणुकीसाठी कसा विचार होतो, असे मतही त्यांनी "सकाळ'कडे व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्रात अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT