Crime esakal
पुणे

Pune Crime : तडीपार गुंडाच्या खूनप्रकरणी पाचजणांना अटक

सय्यदनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात तडीपार गुंडाच्या झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सय्यदनगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात तडीपार गुंडाच्या झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली. वानवडी परिसरातील सय्यदनगरमध्ये गुरुवारी (ता. १०) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

आजीम वजीर शेख ऊर्फ अंत्या (वय ३५, रा. सय्यदनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सादिक अब्दुल करीम शेख, अनिस सादिक शेख, शाकीर कादीर सय्यद, मोहसीन जावेद सय्यद आणि शहाबाज कादीर सय्यद (सर्व रा. सय्यदनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. वानवडी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांतील तरुण एकमेकांचे नातेवाईक आहेत. परवा रात्री लहान मुलांमध्ये भांडण झाले होते. तो वाद मिटविण्यासाठी नातेवाईक गुरुवारी रात्री जमले होते. त्यावेळी तडीपार गुंड आजीम शेख हा त्याठिकाणी आला होता.

त्याने अरेरावीची भाषा वापरल्यामुळे झालेल्या हाणामारीत सात-आठ तरुणांनी आजीमवर हत्याराने वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्यासह वानवडी पोलिसांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT