Sakal Relief Fund
Sakal Relief Fund 
पुणे

संस्था, संघटनांसह विद्यार्थ्यांचाही हातभार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोल्हापूर, सांगली परिसरांतील पूर ओसरू लागला आहे. त्यामुळे निर्माण झालेले भयावह वास्तव समोर येऊ लागले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभरातून ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

सर्वसामान्य नागरिकांसह विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, व्यापारी, विद्यार्थ्यांनी रोख स्वरूपात मदत दिली आहे. आतापर्यंत फंडाकडे ३५ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. पुण्यातून सांगली आणि कोल्हापूरसाठी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा करण्यासही सुरवात झाली आहे.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता स्वच्छतेच्या कामाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागत असून, ‘सकाळ रिलीफ फंडा’ने शासकीय यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या कामाला प्राधान्य दिले आहे. नागरिकांकडून येणाऱ्या मदतीचा योग्य समन्वय साधून ‘सकाळ’ने आता कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार अन्नधान्य, औषधे, ब्लॅकेट्‌स, नवीन कपडे, चादरी असे साहित्य जमा करून ते पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्यास सुरवात केली आहे. पुण्यातून आजच अन्नधान्याचा एक ट्रक सांगलीला रवाना करण्यात आला आहे. 

दरम्यान, ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यात विविध उद्योग समूह, सामाजिक संस्था, बॅंका, पतसंस्था, गणेश मंडळे, विविध कामगार संघटना, शालेय विद्यार्थी, आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’कडे धनादेश सुपूर्त केले आहेत. 

आपण आपली मदत सकाळच्या खालील खात्यात आरटीजीएस अथवा ऑनलाइन पेमेंटनेही पाठवू शकता. त्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे -
 Name - SAKAL RELIEF FUND 
 Bank Account No : 45910010013026
 Name of Bank : IDBI Bank, Laxmi Road, Pune 
 IFSC CODE : IBKL 0000459
ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांना त्यांच्या रकमेची पावती पाठविण्यासाठी पुढील माहिती आमच्या 9881099908 या व्हॉटस्‌ॲप नंबरवर पाठवावी.  यूटीआय नंबर, पूर्ण नाव, पॅन कार्ड आणि पत्ता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार X Factor? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT