Pune Flood 
पुणे

Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना मिळणार 25 हजार रुपये, जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

District collector suhas diwase flood victims of Pune:अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणी आता पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

Pune Flood: पुण्यात काही दिवसांपूर्वी पावसाने हाहाकार माजवला होता. सततच्या पावसामुळे आणि धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं होतं. याप्रकरणी आता पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पूरग्रस्तांना २५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईचे निकष शिथिल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले असल्याने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. अनेकांच्या घरात दोन ते तीन दिवस पाणी साचून होते.

व्यापारी, दुकानकार यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मतदारयादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानधारक दुकानदार यांना नुकसानीच्या ७४ टक्के किंवा जास्तीत जास्त ५० हजार जी रक्कम जास्त असेल ती दिली जाणार आहे. टपरीधारकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. शहरात अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे देखील पूराची तीव्रता वाढली होती. ही अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहेत. याशिवाय पूर रेषा देखील नव्याने आखण्यात येणार आहे.

पुण्याला पावसाने अक्षरश: झोडपले होते. काही ठिकाणी छातीपर्यंत पाणी साचलं होतं. एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु होतं. काही लोकांना जीव देखील गमावावा लागला होता. अनेकांची घरे उद्धवस्त झाली, घरातलं सर्व वाहून गेलं. अशावेळी त्यांना मदतीची अपेक्षा होती. सध्या प्रशासनाकडून पंचनामे सुरु आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT