flok
flok 
पुणे

(व्हिडिओ) लोककलावंत मुख्यमंत्र्यांना म्हणाले, तुम्ही आमच्यासाठी नक्की धावून याल...

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे चार महिन्यांपासून लॉकडाउन झाल्यामुळे लोककलावंतांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. लोककलावंतांना सरकारने आर्थिक मदत द्यावी व जनजागृती करण्याची कामे द्यावीत, अशी मागणी लोककलावंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत बैठकीसाठी पुण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोककलावंतांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर येऊन ही मागणी केली. होळी पौर्णिमा ते अक्षयतृतीया हा वर्षभरातला लोककलावंतांचा कार्यक्रमांचा सिझन असतो. नेमक्या या कालावधीत लॉकडाउन झाल्यामुळे लोककलावंतांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या प्रत्येक संचात किमान वीस कलावंत आणि प्रत्येक कलावंताच्या कुटुंबातील माणसे, असे एकूण साडेआठ हजार जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. सरकारने लोककलावंतांना आर्थिक मदत द्यावी. 

महिला बालकल्याण, मंत्रालयातील सामाजिक न्याय विभाग, आरोग्य विभाग, समाज कल्याण विभाग, पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग अशा बऱ्याच काही विभागाचे जनजागृती कार्यक्रम लोककलावंतांना मिळावेत. लोककलाकार संस्थांना असे कार्यक्रम थेट मिळाले, तरच लोककलावंत जगतील. लोककलाकारांच्या हितासाठी कोणत्याही सरकारने काहीच केलेले नाही. आतापर्यंत फक्त आश्वासने मिळाली. पण, तुम्ही आमच्यासाठी धावून याल, असे आम्हाला नक्की वाटते, असे निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT