PAU19A03025.jpg
PAU19A03025.jpg 
पुणे

अहो काका...सिग्नलचा मान राखा 

सकाळ वृत्तसेवा


पुणे : काका वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट घाला, सिग्नलचा मान राखा, असे भावनिक आवाहन करत विद्यार्थी वाहनचालकांचे प्रबोधन करत होते. मयूर कॉलनीतील चौकात झालेल्या अनोख्या उपक्रमाने नागरिकही आश्‍चर्यचकीत झाले. निमित्त होते, "एक दिवस वाहतूक नियंत्रणासाठी' या उपक्रमाचे. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बालशिक्षण मंदिर शाळेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक रक्षाबंधन सप्ताहातील वाहतूक नियंत्रण आणि हेल्मेट वापराबद्दल जागरूकता मोहीम विद्यार्थ्यांनी चौकातील सिग्नल परिसरात राबवली.

सर्व इयत्तांमधील मुले एक तास चौकाचौकात सिग्नल नियंत्रित करून हेल्मेट वापरासाठी नागरिकांना विनंती करत होते. सिग्नल्सचा मान राखण्यासाठी आग्रही राहत होते. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. आपल्या गाड्या बाजूला घेत नागरिक सोबत असलेले हेल्मेट घालून मार्गस्थ होत होते. अनेक नागरिक थांबून या उपक्रमात सहभागीही झाले. विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देत होते. बालशिक्षणमध्ये असे उपक्रम नेहमी राबविले जातात आणि अशा उपक्रमांचे आम्ही मयूर कॉलनीतील रहिवासी साक्षीदार आहोत, असेही नागरिक सांगत होते. 

नागरिकांना, पालकांना तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना पत्र लिहून तसेच फलक बनवून, पथनाट्य सादर करत या विद्यार्थ्यांनी प्रबोधन केले. आपला जीव वाचला तर हव्या त्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी धावपळ करता येईल हे वास्तव विद्यार्थी अगदी मनापासून सांगण्याचा प्रयत्न करत होते. 

सामाजिक रक्षाबंधन सप्ताहात दरवर्षी सामाजिक समस्यांवर वाचा फोडत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी व सोसायटीच्या सर्व शाखेतील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी अगदी उत्साहाने सकारात्मक उपक्रम राबवत असतात. यंदा नागरी सुरक्षा व वाहतूक नियंत्रण या ज्वलंत समस्येवर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या संपूर्ण उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर यांचे मार्गदर्शन लाभले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT