Aakash Waghmare
Aakash Waghmare Sakal
पुणे

पुण्याच्या डिलिव्हरी बॉयला अमिताभ बच्चन यांच्याकडूनच फूड डिलिव्हरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सरकारी अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून कौटुंबिक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी फूड डिलिव्हरी करणारा पुण्यातील आकाश वाघमारे सध्या अनेकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. नुकतीच त्याला कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाला होती. यात त्याला अपेक्षित असलेली रक्कम जिंकता आली नाही. मात्र अमिताभ बच्चन यांच्याकडूनच त्याला फुडची डिलिव्हरी मिळाली.

पहिल्या फेरीत बरोबर उत्तर दिल्यानंतर आकाश हा २५ लाखांच्या प्रश्‍नापर्यंत पोचला होता. मात्र दुर्दैवाने त्यांचे त्या प्रश्‍नाचे उत्तर चुकले. त्यामुळे त्याला तीन लाख २० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. केबीसीमध्ये जाऊन मोठी रक्कम जिंकता येर्इल, अशी त्याची इच्छा होती. मात्र ती पूर्ण झाली नाही. असे असले तरी त्याला बच्चन यांनी दिलेले गिफ्ट आयुष्यातील सर्वोच्च आनंद देणारे आहे, असे त्याने सांगितले.

याबाबत आकाश म्हणाला, काम करीत असताना मलाही थकला येतो. भूक लागते. मात्र इच्छा असली तरी फूड डिलिव्हरीचे काम थांबवता येत नाही. कारण त्यावर माझे उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे कधी-कधी वाटते की, आपल्यासाठी देखील कोणीतरी पार्सल मागवावे. हीच बाब बच्चन यांना समजली. त्यामुळे त्यांनी मला विचारले होते की, तुला काय खायला आवडते. तर मी त्यांना बिर्याणी आवडत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी शो सुरू असताना स्वतः माझ्यासाठी बिर्याणी मागवली. ‘हम है आपके आजके डिलिव्हरी पार्टर’, असे म्हणत त्यांनी मला ते पार्सल दिले. तसेच आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या पर्सालचा आस्वाद घ्या, असे सांगितले. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वोच्च आनंद व समाधान देणारा क्षण होता.

दिवसा अभ्यास रात्री फूड डिलिव्हरी :

२७ वर्षीय आकाश हा मुळाचा बीड जिल्ह्यातील आहे. कोथरुड येथे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यात तो कुटुंबासोबत राहतो. त्याचा मोठा भाऊ रिक्षा चालवतो. छोटा भाऊ मोबाइलच्या दुकानात कामाला आहे. वडील आजारपणामुळे घरीच असतात तर आर्इ घरकाम करते. तो पाच वर्ष एका सीएकडे ड्रायव्हर होता. मात्र कोरोनाकाळात त्याला नियमीत कामावर बोलविण्यात येत नव्हते. त्यामुळे त्याने उत्पन्नाचा पर्यायी मार्ग म्हणून रात्रीच्या वेळी फूड डिलिव्हरीचे काम सुरू केले. तर ज्या दिवशी कामावर बोलावले जात नाही त्या दिवशी तो एमपीएससीचा अभ्यास करतो.

फूड डिलिव्हरी करणा-या माझ्यासारख्या अनेकांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मान झाला आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉयच्या कामात कोणाला कमीपणा वाटणार नाही. केबीसीत केवळ पैसे नाही तर सन्मान देखील मिळाला.

- आकाश वाघमारे, फूड डिलिव्हरी बॉय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ओडिशातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची काँग्रेसकडून यादी जाहीर

SCROLL FOR NEXT