Corona-Danger 
पुणे

Coronavirus : परदेशातून आलेल्यांचे सक्तीने विलगीकरण

सकाळवृत्तसेवा

लक्षणे दिसणाऱ्यांना १४ दिवस नायडू रुग्णालयात ठेवणार
पुणे - पुण्यातील विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना २४ तास विलगीकरण कक्षात ठेवणार आहे. तेथे त्यांची आरोग्य तपासणी होईल. त्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसणाऱ्यांना १४ दिवसांसाठी डॉ. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात ठेवण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.  

केंद्र सरकारने निश्‍चित केलेल्या सात देशांमधील प्रवाशांची ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’मध्ये वर्गवारी करण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळावर एकावेळी हजारो प्रवासी येतात. परिणामी, अशी वर्गवारी करता येणे शक्‍य नाही. त्यामुळे प्रवाशांची वर्गवारी करण्यासाठी तात्पुरता विलगीकरण कक्ष उभारला आहे. ताप, सर्दी, खोकला असणाऱ्या प्रवाशांचा समावेश ‘ए’ वर्गात केला जाईल. अशा प्रवाशांना विमानतळावरून रुग्णवाहिकेतून थेट महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करणार आहे. फक्त ‘बी’ आणि ‘सी’ वर्गवारी करण्यासाठी तात्पुरत्या विलगीकरण कक्षात वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक सज्ज करणार आहे. त्यांच्या मदतीने ‘बी’ आणि ‘सी’ यातील रुग्णांची वर्गवारी करण्यात येईल, असे डाॅ. म्हैसेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT