Forgotten returned gold jewelry hotel owner sakal
पुणे

Pune : मंचर येथे मोरया हॉटेलमध्ये विसरलेले हॉटेल मालकांनी प्रामाणिकपणे केले परत

दागिने पाहून महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू ; 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने

डी.के.वळसे पाटील

मंचर :येथील लक्ष्मी रस्त्यावरील मोरया स्नँक्स हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी आलेल्या निलम अतुल टाव्हरे (रा निरगुडसर ता.आंबेगाव) यांचे 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली डबी विसरली होती. हॉटेलचे मालक राम डोके व त्यांचा मुलगा तेजस डोके यांनी प्रामाणिकपणे सर्व दागिने त्यांना परत केल्यामुळे नीलग यांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

कानातील बाळी, गळ्यातील बदाम, कर्णफुले आदी सोन्याचे दागिने टाव्हरे यांनी मंगळवारी खरेदी केले होते. त्या नंतर कुटुंबातील ३ ते ४ सदस्या सह त्यांनी मोरया स्नँक्स हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर नाश्ता केल्यानंतर त्या निघून गेल्या. दरम्यानच्या काळात तेजस डोके टेबल स्वच्छ करण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांना सोन्याचे दागिने असलेली डबी दिसली. हा प्रकार त्यांनी वडील राम डोके यांना सांगितला.

मंचर बाजार पेठेत दिवाळी निमित्त अन्य वस्तू खरेदी करत असताना आपले दागिने कोठेतरी विसरल्याचे अर्ध्या तासाने निलम टाव्हरे यांच्या लक्षात आले. त्यांनी भेटी दिलेल्या दुकानदारांकडे चौकशी केली. पण त्यांची निराशा झाली त्यांची काळजी वाढली. शेवटी त्या घाबरलेल्या अवस्थेत मोरया स्नँक्स हॉटेल मध्ये आल्या. त्यांनी सोन्याच्या दागिण्याविषयी विचारणा केली.राम डोके यांना निलम यांचेच दागिने असल्याची खात्री पटल्यानंतर सोन्याचे दागिने त्यांना दिले.

“ ऐन दिवाळीत सोन्याचे दागिने गहाळ झाल्यामुळे माझ्या सह समवेत असलेले भयभीत झाले होते .पण राम डोके यांनी प्रामाणिकपणे सोन्याचे दागिने परत करून या पुढे सतत सतर्क रहा असा दिलेला मोलाचा सल्ला माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहील”.

निलम टाव्हरे, निरगुडसर (ता आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT