former mla ramesh thorat and rahul kul 
पुणे

'आमदार राहुल कुल हे दौंडमधील नीरव मोदी'

सकाळवृत्तसेवा

माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज

दौंड (पुणे): दौंडचे आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या चारशे ट्रॅक्‍टरवर एकाच वर्षात चार वेगवेगळ्या बॅंकांचे 100 कोटींचे कर्ज नियमबाह्य पद्धतीने काढले आहे. दौंडचे नीरव मोदी म्हणून ते आता ओळखले जात आहेत, अशी टीका पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अप्पासाहेब पवार, सोहेल खान, गुरुमुख नारंग, सचिन गायकवाड, वैशाली नागवडे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, ""कारखान्याकडे उसाची वाहतूक करण्यासाठी करार पद्धतीने लावण्यात आलेल्या चारशे ट्रॅक्‍टर ट्रॉलींवर बॅंक ऑफ इंडिया (केडगाव शाखा), देना बॅंक (बारामती शाखा), आयसीआयसीआय बॅंक (अकलूज शाखा) व बॅंक ऑफ बडोदा (थेऊर शाखा) यांच्याकडून नियमबाह्य पद्धतीने कर्ज काढण्यात आले आहे. या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर ट्रॅक्‍टर मालकांनी आमच्याशी संपर्क साधल्यास आम्ही त्यांना उच्च न्यायालयात याविरुद्ध दाद मागण्यासाठी सहकार्य करू.''

जिल्हा बॅंकेचे 82 कोटी थकविले
रमेश थोरात म्हणाले, ""उसाला 2650 बाजार देऊ म्हणणारे आता त्यावर बोलत नाहीत. कामगारांचे पगार रखडलेले असून, कारखान्याने सन 2014 - 2015 मध्ये गाळप केलेल्या एकूण उसाच्या एफआरपीपोटी साडेबारा कोटी रुपये ऊस उत्पादकांना दिलेले नाहीत. जिल्हा बॅंकेचे भीमा कारखान्याकडे 82 कोटी रुपये थकल्याने सदर कर्ज एनपीए (अनुत्पादक कर्ज) मध्ये गेल्याने बॅंकेचा एनपीए 15 टक्‍क्‍यांवर गेला आहे. सदर थकबाकीप्रकरणी साखर संघ, राज्य सहकारी बॅंक व सहकार खात्याकडे तक्रार केली आहे.''

कुल भाजपकडून लढणार..
भीमा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज स्वरूपात दिलेले 35 कोटी 94 लाख रुपये हे आमदार राहुल कुल यांनी पुढील निवडणूक कमळावर लढविण्याच्या अटीवर दिले आहे.
- रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT