vinayak nimhan
vinayak nimhan 
पुणे

माजी आमदार विनायक निम्हण यांना अटकपूर्व जामीन मंजूर 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाणेर येथील जागेच्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार विनायक निम्हण यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. या प्रकरणात त्यांचे पुत्र माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्यावरही चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल असून त्यांना यापूर्वी जामीन मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

संजय तुकाराम जगताप (वय 39, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दरम्यान याच प्रकरणात यापूर्वी सनी निम्हण यांनी देखील संजय जगताप यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जगताप यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. बाणेर येथील प्लॉट क्रमांक 36 व 64 जवळ हा प्रकार घडला होता. जगताप हे 6 जुलै रोजी सकाळी सहा वाजता कामगारांना चहा देऊन खुर्चीवर बसले होते. निम्हण यांनी त्या ठिकाणी येऊन कामगारांना शिवीगाळ करुन "जागा काय तुमच्या बापाची आहे काय,' असे बोलले. त्यामुळे जगताप हे खुर्चीवरुन उठले असता आरोपींनी लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या हातावर, डोक्‍यात व पोटावर मारुन जखमी केली, असे फिर्यादीत नमूद आहे. निम्हण यांच्यावतीने ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. सत्यम निंबाळकर आणि शिवम निंबाळकर यांनी अटकपुर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT