Four arrested including goldsmith in Mumbai Latur Express theft case sakal
पुणे

मुंबई - लातूर एक्सप्रेसमधील चोरी प्रकरणी सुवर्णकारासह चौघांना अटक

सुवर्णकाराकडून पावणेसात लाख रूपयांचे सोने जप्त

प्रफुल्ल भंडारी

दौंड - मुंबई - लातूर एक्सप्रेसमधील प्रवाशाचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात चोरीचा माल विकत घेणार्या एका सुवर्णकाराकडून पावणेसात लाख रूपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी या बाबत माहिती दिली. ३ एप्रिल २०२२ रोजी मुंबई - लातूर एक्सप्रेसने प्रवास करणार्या एका प्रवाशाकडील ९ लाख ७९ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग पुणे ते दौंड प्रवासादरम्यान चोरीला गेली होती. सदर प्रकरणाचा दौंड लोहमार्ग पोलिस आणि लोहमार्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तपास करीत असताना त्यांना दस्तर्या गुलच्या काळे (वय ३६), उषा एव्हरेडी पवार (वय ३५) लक्ष्मण सतिश भोसले (वय २२) आणि एक अल्पवयीन मुलगी (चौघे रा.भूम, जि. उस्मानाबाद) यांनी चोरी केल्याची माहिती मिळाली.

सदर चोरलेले दागिने दयानंद महामुनी (रा. वालव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) या सुवर्णकाराला विकल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दयानंद महामुनी याच्याकडून पावणेसात लाख रूपये मूल्य असलेले १३७ ग्रॅम सोने जप्त करून त्यास अटक करण्यात आली.

पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, इरफान शेख, सहायक निरीक्षक अस्मिता पाटील, फौजदार रूपाली उबाळे यांच्यासह सुनील कदम, आनंद वाघमारे, अमरदीप साळंखे, संतोष कांबळे, अरूण टिंगरे, रूपेश पवार, सुरेखा बनसोडे, साधना वाघमारे, एकनाथ लावंड, सुनील कुंवर, आदींनी कारवाईत भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT