Yerwada Jail pune
पुणे

Pune Crime: धक्कादायक! कोयता गँगमधील चार अल्पवीयन मुलांचे बालनिरीक्षणगृहातून पलायन

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत दिसून येत होती

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगची दहशत दिसून येत होती. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या काही मुलांना पुण्यातील येरवड्याच्या बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले होते. या पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्राच्या बाल निरीक्षण गृह याठिकाणी असलेल्या काही तरुणांनी पलायन केले आहे.

यामध्ये इम्रान शेख, अमन तिवारी, गौस कुरेशी, सुमित चंदमनीराम अशी या तरुणांची नावे आहेत. निरीक्षण गृहाची खिडकी फोडून शिडी लावून या मुलांनी पलायन केलं आहे. आरोपींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक केले असून बालसुधारगृहांमध्ये ठेवण्यात आले होते.

शहरातील विविध गुन्हांचे आरोपी असलेले हे तरुण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी येरवाड्याच्या बाल निरीक्षणगृहात केली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी या बाल निरीक्षणगृहात या तरुणांची आपापसात भांडण झाली यावेळी काही तरुणांनी तिथे असलेली खिडकी फोडली आणि या गोंधळाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी असलेल्या एका खोलीतून शिडी आणून खिडकीला लावली आणि तिथून या चार जणांनी पळ काढला आहे.

फेब्रुवारी महिन्यात सुद्धा या ठिकाणी असलेल्या ७ जणांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Trade Rumours : हार्दिक पांड्या LSG चा कर्णधार बनणार? MI त्याच्या बदल्यात स्फोटक फलंदाजाची मागणी करणार; सर्व गेम फिरणार...

MSRTC : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! एसटीच्या जादा बसफेऱ्यांचे नियोजन; पाहा वेळापत्रक

Breathless at High Altitude: डोंगराळ भागात फिरताना दम लागतोय ? या चुका पडतील महाग ! वेळीच करा हे सोपे उपाय...

Junnar Court: मुलीला मिठी मारून विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास; जुन्नर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

SCROLL FOR NEXT