fraud with a grocery shopkeeper by the fake police In Kondhwa  
पुणे

'ते' आले, पोलिस असल्याचे सांगितले अन् एक लाख रूपये घेऊन गेले

पांडुरंग सरोदे

पुणे : "पुणे पोलिस स्टाफ, क्राईम ब्रांच येथून आलो आहोत. लॉकडाऊनमध्ये गुटखा विक्री करतो. तुझ्यावर कारवाईच करतो", अशी धमकी देत किराणा दुकानदारास तोतया पोलिसांनी पाच लाखाची खंडणीची मागणी करीत एक लाख रूपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात चार तोतया पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रकाश पेमाराम भाटी (वय 32 रा. अजमेरा पार्क,कोंढवा, मुळ रा.राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन चार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''फिर्यादी यांचे कोंढ़वा येथे राजलक्ष्मी सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे. तर धर्मावत पेट्रोल पंपामागे त्यांचे गोडाऊन आहे. 22 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता त्यांचा कामगार व फिर्यादी हे त्यांच्या गोडाउनमध्ये काम करत होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी  दुकानाचे शटर खाली घेण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांना ''तुम्ही कोण आहात, अशी विचारणा केली. तेव्हा त्यानी "आम्ही पुणे पोलिस स्टाफ, क्राईम ब्रांच येथून आलो आहोत." असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्यांनी " तुला कामाशी मतलब. लॉकडाऊनमध्ये गुटखा विक्री करतो. तुझ्यावर कारवाईच करतो", अशी धमकी देत फिर्यादीकडे पाच लाख रूपयाची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यांना 15 हजार रूपये देतो,असे सांगितले. त्यावेळी ते निघून गेले. दरम्यान, 11 वाजता ते पुन्हा दुकानामध्ये आले, त्यांनी फिर्यादीच्या भावाकडे एक लाख रूपये मागितले. त्यांनी 50 हजार रुपये असे सांगितले. त्यानंतरही आरोपी एक लाख रुपये मागत होते. अखेर फिर्यादी व त्यांच्या भावाने नातेवाईक व मित्राकडून 50 हजार रुपये उसने घेऊन त्यांना एक लाख रूपये दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिर्यादी यांनी आरोपीच्या गाडीचा क्रमांक लक्षात ठेवला. तसेच घडलेला प्रकार त्यांच्या मित्राला सांगितला. त्यावेळी ते तोतया पोलिस असल्याचे मित्राने त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षल चैताली गपाट करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT