पुणे

लष्कर भरतीच्या नावाखाली फसवणूक;गुन्हे शाखेकडून दोघांना अटक 

सकाळवृत्तसेवा

पुणे - लष्करात भरतीसाठी लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणारे मोठे रॅकेट लष्करी गुप्तचर विभागाच्या मदतीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने उद्धवस्त केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदारालाही ताब्यात घेतले आहे. याच पद्धतीने राज्यातील तरुणांची फसवणूक झाल्याची शक्‍यता असून पोलिसांकडून आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. 

अली अख्तर व महेंद्र सोनवणे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांचा साथीदार आझाद खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी गणेश साळुंके (वय २१, रा. डोंगरसनी, तासगाव) याने फिर्याद दिली असून त्यावरुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या वतीने रविवारी पुण्यात लष्करातील "रिलेशन आर्मी' या प्रकारामधील भरती सुरू होती. त्यासाठीची समान प्रवेश परिक्षा रविवार होती. दरम्यान, काही जण संबंधित परिक्षेसाठीचे पेपर फोडून ते उमेदवारांना पोचविणार असल्याची खबर लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली. त्यांनी यासंदर्भातील माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकास दिली. त्यानुसार, गुन्हे शाखेने अली अख्तर व महेंद्र सोनवणे यांना अटक केली. त्यांची चौकशी केली, त्यावेळी त्यांनी परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील तरुणांना प्रश्‍नपत्रिका देण्याचे सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याची कबुली दिली. त्याचवेळी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांची मुळ कागदपत्रे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी फिर्यादी गणेश साळुंके याच्याशी संपर्क साधला. साळुंके याचे वडील लष्करातून निवृत्त झाले आहे. त्यामुळे त्यालाही लष्करामध्ये भरती होण्याची इच्छा होती. त्यानुसार, "रिलेशन आर्मी' अंतर्गत सोल्जर जीडी या पदाची २८ फेब्रुवारीला परीक्षा होणार असल्याची माहिती त्यास मिळाली. त्यानुसार, त्याने पुण्यातील बॉम्बे सॅपर्स येथे येऊन पाच जानेवारीला मैदानी चाचणी दिली. त्यानंतर त्याची ५ फेब्रुवारीला वैद्यकीय तपासणीही झाली. त्यानंतर समान प्रवेश परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र घेऊन तो बाहेर पडत असताना आझाद खान नावाच्या व्यक्तीने तो लष्करामध्ये असून अली अख्तर व महेंद्र सोनवणे हे दोघेजण भरती प्रक्रियेचे प्रमुख असल्याचे सांगितले. त्यावेळी त्या तिघांनी फिर्यादीस लष्करात भरती करून देऊ, त्यासाठी तीन लाख रुपये लागतील, असे सांगितले. दरम्यान, त्यांनी फिर्यादीस संबंधित परीक्षेचे नियमीत प्रश्‍नसंच पाठविले. समान प्रवेश परिक्षेची प्रश्‍नपत्रिका २७ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास पाठविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तरच प्रश्‍नपत्रिका मिळेल, असे सांगितल्याने फिर्यादीने त्यांना एक लाख रुपये दिले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

सोल्जर पदासाठीची परीक्षा रद्द 
लष्कराकडून रविवारी देशभरात घेण्यात आलेली सोल्जर (जनरल ड्यूटी) पदासाठीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली. लष्करी गुप्तचर विभागाच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये संबंधित परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्यानंतर त्यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली असून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राहावी, यासाठी परीक्षा रद्द करण्यात आली. तसेच भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्या आहेत का?, याबाबत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी याविषयी आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT