44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg 
पुणे

जादा नफ्याचे आमिष दाखवुन बाप-लेकाची फसवणुक

सकाळवृत्तसेवा

पुणे  : शैक्षणिक संस्थामध्ये गुंतवणुक केल्यानंतर जादा परतावा देण्याचा बहाणा पैसे घेतले, मात्र परत न करता दोघांनी 11 लाख रूपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याच पद्धतीने अन्य नागरिकांची ही लाखो रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संबंधित शिक्षण संस्थेच्या दोघांना अटक केली. 

विलास कुरडे ( वय 52, रा. कोथरुड) यांनी याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन मिलिंद जनार्धन पिंपळकर (वय 45) व मोहिनी मिलिंद पिंपळकर (वय 40, रा.चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.

सहायक पोलिस निरीक्षक बी.एम. रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळकर यांनी 2014 मध्ये वृत्तपत्रामध्ये "रियल एज्युकेशन फर्म" सुरु करणार असल्याची जाहिरात दिली होती. त्यामध्ये पाच टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवुन गुंतवणुक करण्यासाठी आवाहान केले होते, त्यानुसार फिर्यादी यांनी त्यास प्रतिसाद देत स्वत:च्या नावे पाच आणि मुलाच्या नावे सहा असे 11 लाख रूपये गुंतविले. त्यानंतर फिर्यादींना केवळ 3 टक्के दराने व्याजाची रक्कम दिली. आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी उर्वरीत रक्कम मागन्यास सुरवात केली. मात्र, आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. दरम्यान, फिर्यादी यांच्याप्रमाणेच संजय भेलके (रा. धायरी), भरत विटकुरकर व कोंढवा येथे राहणाऱ्या एका महिलेसही गुंतवणुकीपोटी जादा रकमेचे आमिष दाखवुन तब्बल 39 लाख रूपयाची फसवणुक केल्याचे उघडकी आले. दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी रियल शिक्षन संस्थाचे दोघाना अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT