पुणे

गरजू आधार बातमी

CD

PNE26W41293
अहिल्यानगर ः आनंदऋषी हॉस्पिटल येथे मोफत ह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर पार पडले.


आनंदऋषी हॉस्पिटल गरजूंच्या आरोग्याचा आधार
सविता फिरोदिया ः १५० रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी
अहिल्यानगर, ता.१० ः आनंदऋषी हॉस्पिटल हे मानवतेचे मंदिर आहे. गरजूंच्या आरोग्याचा आधार ठरले आहे. हॉस्पिटलचे कार्डियाक सेंटर रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. या सेवा कार्यात योगदान देताना समाधान आणि आनंद मिळत आहे, असे प्रतिपादन सविता फिरोदिया यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषी महाराज यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त सविता व सीए रमेश फिरोदिया यांच्यातर्फे स्व. बदामबाई फिरोदिया यांच्या स्मरणार्थ हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी साक्षी फिरोदिया, सीए आयपी अजय मुथा, निखिलेंद्र लोढा, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, कार्डिओलॉजिस्ट डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. विनय छल्लाणी, डॉ. स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.

लोढा यांनी फिरोदिया परिवाराच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला. हॉस्पिटलमध्ये अल्पदरात सिटीस्कॅन, एमआरआय मशीन, तसेच ब्लड बँकेची सुविधा त्यांच्या आर्थिक योगदानामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अग्रवाल म्हणाले, हॉस्पिटलने उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे भारतात नावलौकिक मिळवला आहे. आतापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक बायपास सर्जरी यशस्वी झाल्या आहेत, तर एक लाखांपेक्षा अधिक अँजिओप्लास्टी आणि अँजिओग्राफी झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सीए मुथा, डॉ. कटारिया यांनी मनोगत व्यक्त केले. या हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Zika Virus: पुण्याला ‘झिका’चा धोका कायम! विषाणूच्या जनुकीय संरचनेतही आढळले बदल; ‘एनआयव्‍ही’च्‍या शास्‍त्रज्ञांचा शोध

Sunetra Pawar: दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून धीर; पाणी, चारा, शिक्षणासाठीही मदत

IND vs WI 1st ODI Live: रोहित शर्मा बाद झाला, विराट कोहली मैदानावर आला... येताच २८ वर्षांपूर्वीचा मोहम्मद अझरुद्दीनचा विक्रम मोडला...

४ वर्षात १११ खासदार-आमदारांचे पक्षांतर, सर्वाधिक इनकमिंग झालेला पक्ष भाजप नव्हे, भाजपात २९ जणांचा प्रवेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT