पुणे

मंगळवेढा तहसीलचा उपक्रम. घरकुल लाभार्थ्यांना मंगळवारी व शुक्रवारी वाळू वाटप

CD

MGV26B15450
तांडोर (ता. मंगळवेढा) ः येथे घरकुल लाभार्थींना वाळूचे ऊ-चलन वाटप करताना पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे, प्रांताधिकारी बी.आर.माळी.

मंगळवेढ्यातील ८५७९ लाभार्थींना मिळणार मोफत वाळू
आठवड्यातून दोन दिवस देणार ई-चलन; बांधकामाच्या टप्प्यानुसार मिळणार वाळू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २५ ः तालुक्यातील घरकुल लाभार्थींना शासनाने निश्चित केलेल्या शासन नियमानुसार देय असलेल्या मोफत वाळू वाटपास सुरुवात करण्यात आली. याचा तालुक्यात ८५७९ घरकुल लाभार्थींना लाभ होणार आहे.

तांडोर येथून पहिल्याच दिवशी ३१ लाभार्थींना प्रत्येकी २ ब्रास वाळूचे वाटप पंचायत समिती सदस्या जयश्री कवचाळे व प्रांताधिकारी बी. आर. माळी यांच्या हस्ते ई-चलन व गुलाबपुष्प देऊन स्वागत करून वाळूचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी डॉ. जस्मीन शेख, नोडल अधिकारी श्रीनिवास शेरला, मंडल अधिकारी महेश पवार, ग्राममहसूल अधिकारी सचिन वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी संगीता माने व इतर नागरिक उपस्थित होते.
तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत एकूण ९२१९ घरकुल लाभार्थी असून, सद्यःस्थितीत पात्र लाभार्थी ८५७९ आहेत. त्यातील बांधकाम चालू असलेल्या घरकुलाची स्थिती पाहून त्यांना आवश्यक वाळू मोफत देण्यात येणार आहे. घरकुल लाभार्थ्यींना घराच्या बांधकामासाठी मोफत वाळू मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ३१ डिसेबर २०२५ रोजी परिपत्रक काढून घरकुलसाठी वाळू वाटपाची कार्यपद्धती निश्चित केली होती. त्यानुसार घरकुल बांधकामाचे टप्पे निश्चित करून त्या-त्या टप्प्याला बांधकामानुसार वाळू वाटप होणार आहे. ही प्रक्रिया प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी राबवली जाणार असल्याने आता घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. घरकुलाचा पाया खोदताना २ ब्रास व पुढील बांधकामास ३ ब्रास याप्रमाणे मोफत वाळू दिली जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांची माहिती महाखनिज प्रणालीवर अपलोड करून लाभार्थ्यांची आधार कार्डच्या माध्यमातून पडताळणी करून त्यांना ई-चलन काढून वाहतूक पास देण्यात येणार आहे. ज्या लाभार्थ्यांना ई-चलन देण्यात येईल त्या लाभार्थींना दर मंगळवारी व शुक्रवारी त्यांच्या जवळच्या वाळू गटातून मोफत वाळू दिली जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेसाठी नोडल अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्रीनिवास शेरला यांची नियुक्ती करण्यात आली.
-----
कोट
- पंचायत समितीमार्फत प्रत्येक आठवड्याला पात्र लाभार्थी यांना ई-चलन तयार करून मोफत वाळू दिली जाणार आहे. याचा लाभ तालुक्यातील घरकुल लाभार्थी यांनी घ्यावा.
- मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा
-------
प्रचारात गाजला वाळूचा मुद्दा
पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भगीरथ भालके यांनी घरकुलाचा मुद्दा प्रचारामध्ये अधिक चर्चेला आणला होता. आचारसंहिता संपताच प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT