Dr Amol Bagul
Dr Amol Bagul Sakal
पुणे

शिक्षकांसाठी उद्या मोफत वेबिनार; डॉ. अमोल बागूल यांचे मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ एनआयई’ (Sakal NIE) (न्यूज पेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांसाठी (Teacher) ‘मैत्री डिजिटल युगाशी- शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा’ (Guidance Workeshop) ही मोफत ऑनलाइन झूम वेबिनार (Zoom Webinar) स्वरूपात मालिका सुरु केली आहे. यातील सातवी मार्गदर्शन कार्यशाळा ‘काळानुरूप बदलते शैक्षणिक उपक्रम आणि शिक्षकांचा दृष्टिकोन व भूमिका’ याविषयी आहे. याबाबत नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते डॉ. अमोल बागूल यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा गुरुवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन झूम वेबिनारच्या माध्यमातून आयोजित केली आहे. (Free Webinar for Teacher Guidance by Dr Amol Bagul)

डॉ. बागूल हे कमी वयात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील एकमेव व देशातील गुणानुक्रमाने पहिले शिक्षक आहेत. त्यांनी एकाच शैक्षणिक वर्षात २७६ विविध शैक्षणिक उपक्रम राबविले. डॉ. बागूल यांनी १७७ जागतिक विश्वविक्रमात सहभाग घेतला असून, २२ शैक्षणिक ॲपची निर्मिती केली आहे. वर्ल्ड टीचर फोरमच्या माध्यमातून १२१ देशांतील सुमारे पाच हजार शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या आदान-प्रदानासाठी ते प्रयत्नशील असून, त्यांनी २२ देशांच्या शैक्षणिक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे.

शिक्षकांना याबाबत होणार मार्गदर्शन

  • सर्वांगीण (मल्टी टास्किंग) भूमिका कशी असावी.

  • शैक्षणिक उपक्रमांना सामाजिक उपक्रमांची जोड कशी द्यावी.

  • बदलती शैक्षणिक संरचना, उपक्रम व धोरणाला अनुसरून स्वतःला अद्ययावत कसे ठेवावे.

  • आधुनिक- तंत्रज्ञानात्मक शिक्षण पद्धतीचा स्वीकार.

  • शिक्षकांची भूमिका चेंज मेकर, बदल घडविणारी असावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT