Crime News  esakal
पुणे

Pune Crime : जेवायला घातलं नाही म्हणून मित्राने चावा घेत तोडला मित्राचाच कान

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मित्राने जेवायला घातलं नाही म्हणून झालेल्या वादात मित्रानेच कानाचा चावा घेत कान तोडून टाकल्याची घटना पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात घडली आहे. हा सगळा प्रकार २७ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मार्केटयार्ड मधील फुल मार्केटच्या पार्किंग मध्ये घडला असून याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन कुंभार (३९) आणि अनिकेत कांबळे (३५) हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखतात आणि कात्रज भागात एकत्र वास्तव्यास आहेत. २७ जानेवारी रोजी सचिन त्याच्या मैत्रिणी सोबत मार्केट यार्ड येथे असलेल्या फुल मार्केटच्या पार्किंग मध्ये बोलत थांबले होते. यादरम्यान आरोपी अनिकेत कांबळे तिथे आला आणि त्याने सचिनला मला खायला दे किंवा जेवायला चल अशी विचारणा केली. यावर सचिनने नकार दिल्यानंतर अनिकेतला राग अनावर झाला आणि त्याने शिवीगाळ केली.

दरम्यान, या वादाचे रूपांतर नंतर भांडणात झाले आणि अनिकेतने सचिनला धरत त्याच्या कानाला जोरात चावा घेतला. त्याने इतका जोरात चावा घेतला की, सचिनच्या कानाची पाकळी तुटून पडली आणि यात सचिन गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर सचिनने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी आरोपी अनिकेत कांबळे याच्यावर मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३२५, २९४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT