Froth Zika virus cases reported in Pune Preventive plan from Municipal Corporation  
पुणे

Zika virus in Pune : सावधान! पुण्यात झिकाचा संसर्ग वाढतोय? शहरात चौथा रुग्ण आढळल्याने खळबळ; 'अशी' घ्या काळजी

Zika virus in Pune Latest News : एरंडवणे येथे झिकाचे दोन रुग्ण आढळले तर मुंढवा भागात एका रुग्णाची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २८ ः पुणे शहरात तिघांना झिकाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता मुंढवा भागात एका तरुणाला झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्याची तब्येत चांगली असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान झिकाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने एरंडवणे, मुंढवा भागात संशयित रुग्णांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आठ जणांचे रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

एरंडवणे येथे झिकाचे दोन रुग्ण आढळले तर मुंढवा भागात एका रुग्णाची नोंद झाली आहे. खासगी रुग्णालयाने ही माहिती महापालिकेला कळविण्यास विलंब केला, त्यामुळे त्या रुग्णालयास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंढवा येथील महिलेला झिका झाल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये त्याला झिकाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची प्रकृती चांगली असल्याचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी सांगितले.

झिकाचा प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. एरंडवणे येथे दोन रुग्ण आढळल्याने परिसरातील खिलारवाडी, गणेशनगर, सिंहगड रस्ता भागात २ हजार ४२२ नागरिकांचे सर्वेक्षण केले, यामध्ये पाच गर्भवती मातांचे व तीन संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. २ हजार ४७३ घरांचे अळी सर्वेक्षण केले. त्यात ७९ घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. तसेच पाच हजार ४४ पाणीसाठ्याची तपासणी केली. त्यामध्ये १३५ ठिकाणी डासांच्या आळ्या आढळल्या.

मुंढव्यातील २ हजार ८९ नागरिकांचे सर्वेक्षण केले. तर १ हजार ५० घरांमध्ये अळी सर्वेक्षण केले. त्यापैकी ४९ ठिकाणी आळी आढळली. एकूण ३ हजार ५२३ पाणी साठ्याचे सर्वेक्षण केले, त्यापैकी ७३ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. या सर्व भागात औषध फवारणी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली.

माहिती देण्यास टाळाटाळ करू नका

खासगी रुग्णालयात डेंगी, झिका, चिकुनगुनिया अशा आजारांचे रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्याचं माहिती त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात यावी. माहिती देण्यास टाळाटाळ करू नये अशी सूचना महापालिकेने खासगी रुग्णालयांना केली आहे.

अशी घ्याल काळजी घ्याल

- संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे घालावेत

- डास चावू नयेत यासाठी शरीराला क्रीम लावावी

- मच्छरदाणीचा वापर करा, डासांना रोखण्यासाठी उपाययोजना करावी

- फ्रिज, कुलर, झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये

- प्लॅस्टिकचे कप, नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचून देऊ नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT