Pune  sakal
पुणे

Pune : दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ इंधन वाहक मालगाडी घसरली; वाहतूक सुरळीत

दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ पेट्रोल वाहक मालगाडीचा एक टँकर घसरला आहे. सुदैवाने यार्ड मध्ये प्रवेश करताना हा अपघात झाला व त्याशेजारील दौंड - पुणे व दौंड- नगर मेन लाइन लोहमार्ग खुला असल्याने प्रवासी वाहतूक सुरळीत राहिली.

प्रफुल्ल भंडारी / विजय जाधव

दौंड : दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ पेट्रोल वाहक मालगाडीचा एक टँकर घसरला आहे. सुदैवाने यार्ड मध्ये प्रवेश करताना हा अपघात झाला व त्याशेजारील दौंड - पुणे व दौंड- नगर मेन लाइन लोहमार्ग खुला असल्याने प्रवासी वाहतूक सुरळीत राहिली.

दौंड रेल्वे उड्डाण पुलाजवळ मनमाड - नगर - दौंड लोहमार्गावरून एक इंधन वाहतूक करणारी मालगाडी दौंड रेल्वे यार्ड मध्ये प्रवेश करताना सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.

इंधन वाहक मालगाडीच्या मागील बाजुने तिसर्या क्रमांकाचा इंधन वाहतूक करणारा एका टँकरचे चाक लोहमार्गावरून घसरले. रेल्वे प्रशासनाकडून ९ वाजून २६ मिनिटांनी आपत्कालीन परिस्थितीत वाजविले जाणारे भोंगे वाजविण्यात आले. भोंगे वाजल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या.

सदर डब्याची चाके पूर्ववत लोहमार्गावर आणण्यासाठी रेल्वे कडून उपाययोजना सुरू आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, दौंड लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT