G20 summit  Rs 139 crore fund for repairs Will roads pune development
G20 summit Rs 139 crore fund for repairs Will roads pune development  sakal
पुणे

G20 : ‘जी २०’ दुरुस्तीसाठी १३९ कोटींचा निधी; रस्ते चकाचक होणार का?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जून महिन्यात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या तयारीला महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरात रंगरंगोटी, सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था, उद्यानांच्या कामांसाठी ६१ कोटी रुपये, तर पुण्यातील एकंदरीत रस्त्यांची दुरवस्था पाहता राज्य सरकारने तब्बल १३९ कोटी रुपये फक्त रस्तेदुरुस्ती, पादचारी मार्ग, दुभाजकांच्या कामासाठी दिले आहेत.

पथ विभागातर्फे आधीच ३५० कोटी रुपयांची कामे शहरात सुरू असताना आता आणखी १३९ कोटींची त्यात भर पडली आहे. त्यामुळे पुणेकरांना आता तरी चकाचक, खड्डेविरहित आणि सुंदर रस्ते मिळणार का?, याकडे लक्ष लागले आहे.

पुणेकरांना दोन वर्षांपासून खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत विभाग, एमजीएनल, महावितरण, मोबाईल कंपन्यांकडून रस्तेखोदाई करून सेवावाहिन्या टाकल्या आहेत. ही कामे शहरात अजूनही सुरूच आहेत; पण ज्या भागातील कामे पूर्ण झाली आहेत, तेथे डांबरीकरण करून रस्ते चांगले केले जात असल्याचा दावा महापालिका करत असली तरी प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे.

खोदकाम केल्यानंतर रस्ता अर्धवट बुजविला आहे, राडारोडा, सिमेंटचे ब्लॉक न उचलणे, पादचारी मार्ग तुटलेले, निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कमुळे धोकादायक झालेला रस्ते, खचलेले चेंबर प्रत्येक भागात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांचे कंबरडे मोडत आहे.

महापालिकेने रस्ता डांबरीकरणासाठी ३०० कोटी रुपये खर्च करून पाच पॅकेजमध्ये काम करण्यास सुरवात केली आहे. यातून १०७ किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत. पण, आत्तापर्यंत हे काम ३० ते ३४ किलोमीटर इतकेच झाले आहे.

पुढील वर्षभरात खड्डे बुजविणे, चेंबर दुरुस्त करण्यासाठी ४२ कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेला सुरवात झाली आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांकडूनही कामे सुरू झाली असून सध्या ३५० कोटी रुपयांची कामे शहरात केली जाणार आहेत. ज्या पद्धतीने कामे सुरू आहेत, त्यावरून यंदाचा पावसाळाही खड्ड्यांतच जाणार, हे स्पष्ट झाले आहे.

या बाबत स्थानिक मंगेश भगत म्हणाले, ‘‘‘जी २०’च्या निमित्ताने रस्ते दुरुस्ती, सुशोभीकरणासाठी एवढा मोठा निधी शहराला मिळत आहे. त्यातून पादचारी मार्ग, दुभाजक, रस्ते स्वच्छ व सुस्थितीत असावेत, ठिकठिकाणी पडलेला राडारोडा उचलला गेला पाहिजे.’’

हे रस्ते होणार सुंदर...

  • लोहगाव विमानतळ ते गुंजन टॉकीज

  • गुंजन टॉकीज ते वाघोली

  • विमानतळ ते सेनापती बापट रस्ता

  • सोलापूर रस्ता (भैरोबानाला ते शेवाळवाडी)

  • बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, सातारा रस्ता, वारजे-एनडीए रस्ता

  • काही रस्त्यांचे सुशोभीकरण

  • काही चौक आणि रस्ते दुरुस्ती, रस्ते पुनर्डांबरीकरण

  • पादचारी मार्ग दुरुस्ती, लेन मार्किंग, दुभाजक टाकणे, दिशादर्शक फलक बसविणे

‘जी २०’साठी असा होणार २०० कोटींचा खर्च (आकडे रूपयांत)

  • १० कोटी- उड्डाणपूल, भुयारी मार्गांची रंगरंगोटी

  • ३ कोटी- दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड

  • १३९ कोटी- रस्ते सुशोभीकरण आणि दुरुस्ती

  • १० कोटी - आकर्षक विद्युत व्यवस्था

  • २४ कोटी - राडारोडा उचलणे, भिंती रंगविणे

  • ३ कोटी - पूल व हेरिटेज वास्तूंवर रोषणाई

  • ६ कोटी - ‘जी २०’साठी इव्हेंट मॅनेजमेंट

  • ५ कोटी - हेरिटेज मार्ग सुशोभीकरण

शहरात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या अनुषंगाने शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये सर्व विभागांचा समन्वय असावा, यासाठी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत..

— विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT