Language-Knowledge
Language-Knowledge 
पुणे

खेळ, गाण्यांतून विद्यार्थ्यांना मिळणार भाषेचे ज्ञान

संतोष शाळिग्राम

पुणे - विद्यार्थी आता घोकंपट्टीतून नव्हे; तर खेळ, गाणी, गप्पागोष्टी आणि संवादाच्या माध्यमातून भाषेचे प्राथमिक ज्ञान आणि लिपीचे ज्ञान घेणार आहेत. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (विद्या परिषद) प्रारंभिक भाषा अभियान सुरू केले आहे. याद्वारे विद्यार्थ्याला शिक्षकाच्या अधिक जवळ आणून भाषा ज्ञान विकसित केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांची वाचन क्षमता वाढावी, यासाठी गेल्या वर्षी परिषदेने मूलभूत वाचन क्षमता विकास हा कार्यक्रम हाती घेतला होता. सुमारे ३९ टक्के शाळांनी हा उपक्रम राबविला नाही. शिक्षकांनाच या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे हा उपक्रम राबविला गेला नाही. त्यावर चर्चा करून परिषदेने ‘युनिसेफ’ आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रारंभिक भाषा विकास अभियानाचा आराखडा तयार केला आहे. राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अभियान राबविले जाणार आहे. मौखिक संवादातून विद्यार्थ्याला भाषाविषयक ज्ञान देणे, मुलांचे अनुभव, शब्द, भावना फळ्यावर नोंदविणे, कृतियुक्त गाणी, गोष्टी ऐकवणे, खेळ, शब्दभेंड्या, अक्षरभेद, कोडी, शब्दांपासून वाक्‍य तयार करून विद्यार्थ्याचा मौखिक विकास साधला जाईल.

तसेच, वाद्यांचे आवाज, पशू-पक्षी, बडबडगीते, वाहनांचे आवाज ऐकवून त्याची ध्वनीची जाण विकसित केली जाणार आहे.प्रारंभिक भाषेचा विकास करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखन क्षमतांचा विकासही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाचनासाठी चित्रातील साम्य-भेद ओळखणे, चित्र-शब्दकार्डाचे वाचन, वाक्‍याचे शब्दचक्र, चित्रमय उताऱ्याचे वाचन करून घेतले जाणार आहे. शब्दलेखन, जोडाक्षरयुक्त नामपट्ट्या, चित्राच्या नावाचे लेखन आदी प्रकार वापरून लेखन क्षमता विकासावर भर दिला जाणार आहे.

भाषा विकास अभियान यशस्वी करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष अभियान राबविण्यासाठी शाळांना अध्ययन समृद्धी साहित्याचे वापट केले जाणार आहे. शिक्षकांना अभियानाविषयी सविस्तर माहिती होण्यासाठी परिषदेने जीवन शिक्षणचा जुलै महिन्याचा संपूर्ण अंक याच विषयासाठी दिला आहे.

शिक्षकांची जबाबदारी वाढणार 
अभियान राबविताना शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे. त्यांना भाषा विकासासाठी दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक नियोजन करावे लागेल. या विषयाला दररोज ९० मिनिटे देऊन शैक्षणिक कृती त्यांना कराव्या लागतील. यात गप्पागोष्टी, कृतियुक्त गाणे म्हणणे, चित्रमालेवरून गोष्ट तयार करणे, भाषिक खेळ, चित्रवाचन, अनुभव कथन आदी उपक्रम घ्यावे लागणार आहे. राज्यभरातील केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना या अभियानासंबंधी ऑगस्टमध्ये प्रशिक्षित केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT