पुणे

सार्वजनिक रस्ता खोदल्याने गणेगावात नागरिकांची गैरसोय

CD

मांडवगण फराटा, ता. १९ : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील प्रशासक तुकाराम निंबाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी सार्वजनिक रस्ता खोदून नागरिकांची अडवणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी संजीव भोसले यांनी शिरूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे.
भोसले यांच्या तक्रारीनुसार, गट क्रमांक ५१५च्या उत्तरेकडील २००१ मध्ये तयार केलेला रस्ता निंबाळकर यांनी संगनमताने खोदला आहे. रस्त्यावर काटेरी फांद्या व ओंडके टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. या रस्त्यास ३० एप्रिल २००१ रोजी तहसील कार्यालयाने रीतसर मान्यता दिली असतानाही तो बंद केल्याचा दावा अर्जात केला आहे. गावातील सुविधा जपण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीकडूनच रस्ता उद्ध्वस्त केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. प्रशासकीय पदाचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करत, संबंधित व्यक्तीला पदावरून बडतर्फ करावे आणि रस्ता तातडीने खुला करावा, अशी मागणी भोसले यांनी केली.
याबाबत प्रशासक तुकाराम निंबाळकर यांनी सांगितले की, ‘‘सध्या खोदलेला रस्ता हा आमच्या वैयक्तिक वापराचा आहे. सर्व्हे नंबरच्या रस्त्याबाबत ऑर्डर झाली असली तरी अद्याप कारवाई झालेली नाही. संबंधित रस्ता मिळावा यासाठी आम्ही तहसीलदारांकडे मागणी केली आहे.’’ दरम्यान, मंगळवारी (ता. १९) तुकाराम निंबाळकर यांच्यासह सुमारे २० ग्रामस्थांनी शिरूरचे तहसीलदार यांच्याकडे रस्ता मागणीसंदर्भात निवेदन सादर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Raiway Tickets: GNWL, RLWL, PQWL, TQWL! रेल्वे तिकिटावर दिसणारे हे कोड असतात तरी काय? जाणून घ्या त्यांचा अर्थ

MPSC Student Agitation : परवानगी रद्द केल्यानंतरही आंदोलन; ‘एमपीएससी’ आंदोलक विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Maharashtra Live News : मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

गुलाबजामच्या पाकात उंदीर, भिवंडीतील मिठाईच्या दुकानात किळसवाणा प्रकार; Video Viral होताच एफडीएचा छापा

IND vs WI 2nd T20I: वैभव सूर्यवंशीला आज तरी संधी मिळाली का? श्रेयस अय्यरने जाहीर केली Playing XI, विंडीजच्या संघात एक बदल

SCROLL FOR NEXT