UPR२६B०८६९०
पंढरपूर : गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस परिधान केलेले पारंपारिक अलंकार.
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेस
पारंपरिक सुवर्ण अलंकार
पंढरपूर, ता. १४ : श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सोमवारी (ता. १४) श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याचे कंगन जोड, नाम निळाचा, शिरपेच लहान, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मत्स्य जोड, सोन्याचा पितांबर, शालिग्राम हार, तोडे जोड, हायकोल, नऊ पदरी चंद्रहार, पाच पदरी चंद्रहार, तुळशीची माळ एक पदरी, चार पदरी मोहरमाळ आदी अलंकार परिधान करण्यात आले.
रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जाव्याच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. या अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी व भक्तिमय दिसत असून, भाविकांमध्ये या अलंकारांचे विशेष आकर्षण आहे, असे मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.