पुणे

महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरणे बंधनकारक घरगुती गॅस वापरल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाईचा इशारा

CD

महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक
गॅस सिलिंडर वापरणे बंधनकारक

घरगुती गॅस वापरल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत कारवाईचा इशारा

अकोला : गणेशोत्सवासह आगामी सर्व सार्वजनिक उत्सवांमध्ये महाप्रसाद व भोजनाचे आयोजन करताना केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडळे, अन्य मंडळे आणि संस्थांनी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोठ्या प्रमाणात महाप्रसाद तयार करताना मोठ्या क्षमतेची भांडी आणि भडारखान्यांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केल्यास गॅसचा दाब, बर्नरची क्षमता आदी बाबींमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भाविकांची सुरक्षितता आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी व्यावसायिक सिलिंडरचा वापर आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळे व अन्य संस्थांना मंडप, ध्वनी किंवा महाप्रसादासाठी परवानगी देताना महाप्रसादासाठी केवळ व्यावसायिक सिलिंडर वापरण्याची अट लागू राहणार आहे. गॅस एजन्सी व वितरकांनाही सार्वजनिक कार्यक्रमांसाठी केवळ व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
घरगुती गॅसचा वापर आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अन्वये फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येईल. क्षेत्रीय कार्यालयांना १२ सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार तपासणी व भेटी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

SCROLL FOR NEXT