पुणे

शाडूच्या मूर्ती बनविण्याची बार्शीत शतकी परंपरा

CD

BAR26B13648, BAR26B13646
बार्शी : गणेशाची मूर्ती बनविण्यात दंग असलेला मूर्तिकार.
---
शाडूच्या मूर्ती बनविण्याची बार्शीत शतकी परंपरा
अनेक कुटुंबांचे काम अंतिम टप्प्यात; वाहतूक खर्च वाढल्याने दरात वाढ
प्रशांत घोडके : सकाळ वृत्तसेवा
बार्शी, ता. ११ : बार्शी शहरात शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची शतकी परंपरा आजही कायम आहे. यंदाही सूर्यवंशी कुटुंबाची तिसरी पिढी तसेच उपरे, डोंगरे आदी कुटुंबांतील कारागीर मूर्तिनिर्मितीत व्यस्त असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. पर्यावरणपूरक मूर्तींबाबत नागरिकांमध्ये झालेली जनजागृती आणि घरच्या घरी विसर्जनाची सुविधा यामुळे शाडूच्या मूर्तींना मागणी वाढल्याचे चित्र आहे.
बार्शी शहर व परिसरात गणेशमूर्ती बनविण्याच्या व्यवसायावर अनेक कुटुंबांची उपजीविका अवलंबून आहे. पूर्वी यंदे, सूर्यवंशी, डोंगरे आदी मोजकी कुटुंबे या व्यवसायात होती. सध्या सूर्यवंशी कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय पुढे नेत आहे.
पीओपीच्या मूर्ती साचे वापरून कमी वेळेत व मोठ्या संख्येने तयार करता येतात. आकर्षक सजावट व रंगकामामुळे त्यांना ग्राहकांची पसंती मिळते. याउलट शाडूच्या मूर्ती पूर्णतः हाताने घडवाव्या लागतात. सोंड, कान, हात आदी अवयव जोडण्यापासून सजावट व नक्षीकामापर्यंत प्रत्येक कामासाठी वेळ, मेहनत आणि कौशल्य आवश्यक असते. मूर्ती वाळविण्यासाठीही वेळ लागत असल्याने उत्पादन कमी आणि खर्च अधिक होतो.
शाडू माती, पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे मूर्तींच्या किमतीत दरवर्षी काही प्रमाणात वाढ होते. मात्र, पर्यावरणपूरक मूर्तींबाबत जनजागृती झाल्याने मागणी वाढली आहे, असे भालचंद्र शंकर सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यांच्या पत्नी व मुलेही मूर्तिनिर्मितीच्या कामात हातभार लावतात. उपरे, डोंगरे आदी कुटुंबेही या व्यवसायात कार्यरत आहेत. नवीन पिढीतील तरुण या व्यवसायाकडे फारसे वळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
---
कोट
आमच्याकडे परंपरागत शैलीतील सरळ बैठकीच्या मूर्तींसह दगडूशेठ, लालबागचा राजा अन् प्रभावळ (सिंहासन) असलेल्या मूर्ती तयार केल्या जातात. ग्राहकांची पसंती, भावना अन् मागणीनुसार मूर्तींमध्ये बदलही केला जातो. दरवर्षी सुमारे सातशे ते आठशे मूर्ती तयार होतात. त्यापैकी काही मूर्ती कायमच्या ग्राहकांसाठी असतात.
- भालचंद्र सूर्यवंशी, मूर्तिकार, बार्शी
---
चौकट
५० किलो मातीतून आकारानुसार मूर्तींची निर्मिती
५० किलोच्या शाडू मातीच्या गोणीतून सव्वा फुटाच्या चार ते पाच, पाच ते सहा इंचाच्या २० ते २५ अन् आठ ते दहा इंचाच्या १० ते १२ मूर्ती तयार होतात. सर्वांत लहान चार इंचांची मूर्ती १५१ रुपये, तर सर्वांत मोठी दीड फुटाची मूर्ती २१०० रुपयांना विकली जाते. ऑर्डरनुसार गौरी-लक्ष्मीचे मुखवटेही तयार करून दिले जातात, असे मूर्तिकार नारायण सूर्यवंशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

SCROLL FOR NEXT