Pune traffic updates Changes on Ganeshkhind Road esakal
पुणे

Pune traffic updates: पुणेकरांनो लक्ष द्या ! गणेशखिंड रस्त्यावरील ट्रॅफिक जामवर निघाला जालीम उपाय, काय आहेत नवे बदल?

What are the new traffic changes on Ganeshkhind Road in Pune: पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल.

CD

औंध, ता. १४ : गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहावी यासाठी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी काढला आहे.

बाणेर ते शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक :

बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळवून राजभवनसमोरील पंक्चरमधून वळसा (युटर्न) घेऊन पुन्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमार्गे शिवाजीनगरकडे इच्छितस्थळी जातील.

शिवाजीनगर ते औंध :

शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारे वाहने ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरस्तामार्गे इच्छितस्थळी जातील.

औंध ते शिवाजीनगर :

औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या गेटमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून इच्छितस्थळी जातील.


नागरिकांनी वाहतूक बदल मार्गाचा वापर करून वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT