who.jpg
who.jpg 
पुणे

वाघोलीतील सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत काय झाला निर्णय ते पाहा...

सकाळवृत्तसेवा

वाघोली : वाघोलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदा मंडप उभारणार नाही. मंदिरातच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. काही मंडळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात देणार आहेत. मंडळानीच हा निर्णय घेतला. गणेशोत्सव संदर्भात बुधवारी वाघोली ग्रामपंचायत मध्ये बैठक झाली.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन शासनाने केले आहे. वाघोलीतही सार्वजनिक मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी उत्साहात गणेशोत्सव साजरा होतो. यंदा मात्र कोरोनाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी प्रमुख मंडळे व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी यांची बैठक झाली.

या  बैठकीमध्ये अनेक मंडळांनी मांडव न घालता मंदिरातच साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. वाघेश्वर तरुण मंडळाची 61 वर्षाची परंपरा यामुळे खंडित होणार आहे. ते ही मंदिरात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. ज्या मंडळांची मंदिरे नाहीत ती मंडळे एखाद्याच्या घरात मूर्ती प्रतिष्ठापना करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहे.

कोणतीही मिरवणूकही काढली जाणार नाही.  वर्गणीच्या पैशातून औषधें व अन्य वस्तू वाटप करण्याचा मानस ही मंडळांनी व्यक्त केला. अन्य गावातील मंडळानीही असाच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहनही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केले. या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, डॉ. चंद्रकांत कोलते, सदस्य शिवदास उबाळे, माजी उपसरपंच राजेंद्र सातव, बाळासाहेब सातव आदी उपस्थितीत होते.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT