Pune Ganeshotsav Sakal
पुणे

पुण्यातील गणेशोत्सव होणार साधेपणाने; गणेश मंडळांचे एकमत

जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव साधेपणाने आणि ऑनलाईन दर्शनावर भर देत सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला जाणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने (Corona) हाहाकार सुरु आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव (Ganeshotsav) साधेपणाने आणि ऑनलाईन दर्शनावर (Online Darshan) भर देत सामाजिक उपक्रम राबवत साजरा (Celebrate) केला जाणार आहे. मिरवणुका काढण्यात येणार नाही, आदी मुद्द्यांवर गणेश मंडळांचे महापालिकेत गुरुवारी एकमत झाले.

गणेशोत्सवाच्या पुर्वतयारीसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता , माजी नगरसेवक रविद्र माळवदकर यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दीड वर्षात सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. कोरोनाबाबत जनजगृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळांना झिरो बजेट कार्यक्रम द्यावेत. तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी लसीकरण, कोरोना नियम याबाबत समाजप्रबोधन कार्यक्रमाची परवानगी द्यावी, अशी भूमिका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडली.

महापालिकेने मूर्तीदान या उपक्रमाचा विचार करावा. शहरातून साडेचार लाख मूर्ती विसर्जन होत असतात. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. ऑनलाईन कार्यक्रम करावेत, आदी मुद्द्यांवर यावेळी एकमत झाले.

‘पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे याचे महापालिका स्वागतच करत आहे. गणेश मंडळांना उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही. २०१९ ला जे परवाने देण्यात आले होते. तेच यावर्षी चालणार आहेत. कार्यकत्र्यांना पोलीस स्टेशन येण्याची गरज भासणार नाही. तसेच मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळा, मैदाने आणि मोकळया जागेत पाण्याचे हौद बांधण्यात येणार आहेत. फिरत्या हौदांची संख्याही वाढवणार आहे,’’ असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.'

‘पुणे शहरात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांना सहकार्य केले जाईल. मंडळांनीही समाजभान ठेवून उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"प्रिंट खूप बारीक फॉन्टमध्ये होती, वाचन करताना चूक घडली..."; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाच्या अधूनमधून दमदार सरी

Mumbai Rain: वेस्टर्न एक्सप्रेस वेवर खड्डेच खड्डे, पावसाने पोलखोल; वाहतूक धीम्या गतीने, वाहनांच्या रांगा

युवराज सिंगसोबत 'रणजी' खेळलेल्या सत्तूचा एन्काउंटर, क्रिकेटपटू कसा बनला गुन्हेगार?

Kolhapur Former Mayor Grandson Death : कोल्हापूरचे माजी महापौरांच्या नातवाने उचलले टोकाचं पाऊल, नुकतीच नीट परिक्षा दिल्याची माहिती समोर

SCROLL FOR NEXT