Crime-Scene
Crime-Scene 
पुणे

बिबवेवाडीत केबलचालकावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

सकाळवृत्तसेवा

पुणे - भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या केबल चालकास टोळक्‍याने लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून कोयत्याने वार केले. यात केबलचालक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर परिसरात मंगळवारी (ता. १०) सायंकाळी घडली. बिबवेवाडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

सुखदेव दत्ता नळेकर (वय २४, रा. कात्रज कोंढवा रस्ता), सूरज पांडुरंग खंडागळे (वय २५), किरण नवनाथ रणदिवे (वय २३), गोट्या खंडागळे, वैभव डफकिरे, दीपक तानाजी देवकुळे (सर्व रा. शेळके वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मंगेश शिगवण (रा. अप्पर इंदिरानगर) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी शिगवण यांचा केबलचा व्यवसाय आहे. ते मित्र श्‍याम खंडागळे, साधू नवगिरे, विजय जगधने यांच्यासमवेत मंगळवारी सायंकाळी अप्पर इंदिरानगर परिसरातून जात होते. त्या वेळी फिर्यादीच्या ओळखीचे लकप्पा दंडणकर यांना काही व्यक्ती मारहाण करीत होत्या. त्यामुळे फिर्यादी भांडणे सोडविण्यासाठी गेले. तेव्हा संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत ‘तू नेहमी गल्लीतील लोकांना मदत का करतो, पुढारपण का करतो’ असे म्हणून कोयत्याने वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.

त्याचबरोबर त्यांनी फिर्यादीच्या मित्रांनाही लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या केबलच्या कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील २२ हजारांची रोकड व फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली. त्यानंतर त्यांनी दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT