Crime news  esakal
पुणे

पुणे हादरले! अल्पवयीन मावस बहिणींवर सामूहिक बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करत पीडित मुलीला केलं ब्लॅकमेल

याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्वभागातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील दोन अल्पवयीन मावस बहिणीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर आरोपींनी मुलींवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ काढून तो व्हिडिओ दुसऱ्याला दिला व त्यांनी तो व्हिडिओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह एकुण पाच जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने पारगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात दोन अल्पवयीन सख्ख्या मावस बहिणी घरात एकट्या असताना अवधूत राजू पंचरास, कुणाल कैलास बोऱ्हाडे , दोन अल्पवयीन मुले यांनी घरात घुसून दरवाजाला आतून कडी लावली. यानंतर त्यांनी पीडित मुलींना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच सदर आरोपींनी मुलींवर केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करून तो महेश सुभाष तांबे याला दिला होता. त्यानंतर महेश तांबे याने तो व्हिडिओ त्यातील एका मुलीला दाखवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यातील काही संशियाताना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे व पारगाव पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT