dekhava
dekhava 
पुणे

उदापूरमध्ये साकारले प्रबोधनपर देखावे

पराग जगताप

ओतूर (पुणे) : उदापूर (ता.जुन्नर) येथील सह्याद्री गणेश मित्र मंडळ दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आपली हलत्या देखाव्याची परंपरा कायम राखत या वर्षी मंडळाने चांगदेवाचे गर्वहरण हा हलता देखावा साजर करुन समाज प्रबोधन करणारा देखावा केला आहे.

या हलत्या देखाव्याचे उद्घाटन उदापूरचे माजी सरपंच बबन कुलवडे यांनी केले. आतापर्यंत मंडळाला जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, तुषार थोरात, तुळशीराम शिंदे, प्रमिला शिंदे, मच्छिंद्र कुलवडे यांनी व मोठ्या प्रमाणात तालुक्यातील नागरीकांनी व महिला वर्गाने भेट दिली आहे. दररोज सायंकाळी सातपासून ते रात्री दहापर्यंत हा हलता देखावा सर्वांना मोफत पाहण्यासाठी चालु केला जातो.

या सर्व कथानकाचा हलता देखावा सह्याद्री गणेश मित्र मडळाचे सभासद व कलाकार साईनाथ भोर, कुंडलीक शिरसाठ, विकास शिरसाठ तसेच इतर सभासदांनी मिळून केले आहे.

याबाबत मंडळाचे जेष्ठ सभासद संजय ढमढेरे व मोहन वल्हवणकर यांनी सांगितले की, मंडळाने आतापर्यंत विविध धार्मिक व पौराणिक देखावे सादर करुन समाजातील विविध समाजिक प्रश्नावर प्रकाश झोत टाकला आहे. आता पर्यंत मंडळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पायी पंढरीची वारी व साक्षत विठ्ठल दर्शन, त्या आधी शेतकऱ्याचे मनोबल वाढावे या हेतुने श्री संत सावता महाराजांचा भक्तीचा मळा साकारला आहे, श्री काळभैरवनाथाच्या यात्रा उत्सवातील फिरते गाडीबगाड, विठठु माझा लेकुरवाळा, दहीहंडी असे विविध हलते देखावे सादर करुन जिल्हात गावचे नाव झळकवले आहे. तसेच गावातील प्रत्येक सामाजिक कामाकत मंडळाच्या सभासदांचा हिररीने भाग घेऊन सामाजिक बांधिलकी ही जपत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

VIDEO: 'मला जाऊ द्या ना घरी..' धकधक गर्ल माधुरीचा वाजले की बारा वर भन्नाट डान्स पण वैष्णवी पाटीलचं होतंय कौतुक, काय आहे कारण ?

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

SCROLL FOR NEXT