radaroda 11.JPG
radaroda 11.JPG 
पुणे

पुण्यात बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्यामागे राडारोडा 

सागर कुलकर्णी

पुणे : तीन महिन्यांपूर्वी आंबिल ओढ्याच्या पुरात वाहून आलेला गाळ मित्रमंडळ चौकातील महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्यामागे टाकण्यात आला आहे.तो अद्यापही तेथेच पडून असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. 
सप्टेंबरमध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे अरण्येश्‍वरनगर, पर्वती, फुलपाखरू उद्यान, आबा बागूल उद्यान आणि मित्रमंडळ चौक येथे साचलेला गाळ महापालिकेकडून बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाच्या पाठीमागे टाकण्यात आला. तीन महिने उलटूनही हा कचरा तिथेच पडून आहे. या रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. येथे प्रसूतिगृहदेखील आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रार्दुभावदेखील वाढल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. ऑक्‍टोबरमध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येथे येऊन पाहणी केली होती. हा कचरा लवकर उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. 

अाणखी वाचा...http://खऱ्या प्रेमाचा शेवट कधी गोड नसतो कारण खर प्रेम कधी संपत नाही

दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, महापालिकेला कचरा उचलण्यासाठी रुग्णालयातर्फे अर्ज केला आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी ओला कचरा टाकण्यात आला. दवाखान्याच्या समोरील बाजूस कचऱ्याच्या गाड्याही रिकाम्या केल्या जातात. महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचे आणि नवजात बालकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. 
संदीप करपे, किरण पाटील, सागर बाठे, अभिमन्यू मैड, रोहित आरेकर, गणेश वाघचौडे यांनी हा राडारोडा आणि गाळ लवकर उचलण्यात यावा, अशी मागणी केलेली आहे. 

``कर्मचाऱ्यांना राडारोडा आणि गाळ उचलण्याचे आदेश देण्यात येतील. लवकरच कार्यवाही केली जाईल.``
- ज्ञानेश्वर मोळक, सहायक उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT