Garbage in market yard sakal
पुणे

मार्केट यार्ड की कचरा यार्ड; बाजारात येणाऱ्यांना प्रश्न

बाजार समितीने मार्केट यार्डातील सर्व अडत्यांना परिपत्रक काढत ओला-सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

बाजार समितीने मार्केट यार्डातील सर्व अडत्यांना परिपत्रक काढत ओला-सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य केले आहे.

पुणे - बाजार समितीने मार्केट यार्डातील सर्व अडत्यांना परिपत्रक काढत ओला-सुक्या कचऱ्यासाठी बकेट ठेवण्याचे अनिवार्य केले आहे. परंतु अडत्यांनी बाजार समितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. उलट अडते खराब फळे,भाजीपाला गाळ्यासमोर टाकत आहेत. त्यामुळे मार्केट यार्ड आहे की कचरा यार्ड आहे असा प्रश्न बाजारात येणाऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा ओला कचरा आणि सुका कचऱ्याचा बकेट दर्शनी भागात ठेवणे बंधनकारक आहे. तसेच या भगात स्वच्छ्ता ठेवण्याचे देखील अनिवार्य आहे. मात्र अडत्यांना याबाबतचे परिपत्रक काढून सूचना दिल्या आहेत. तरीही अडते फळ आणि भाजीपाला बाजारात रस्त्यावरच मोठया प्रमाणात रस्त्यावर पपई, आंबे, चिक्कू, कलिंगड, सफरचंद, मोसंबी यासह विविध खराब फळे आणि भाजीपाला गाळ्यासमोरच फेकली जातात. यावरूनच तीन चाकी, चार चाकी गाड्या ये-जा करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. याच दुर्गंधीत फळे भाजीपाला विकला जातो. याचा परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.

सकाळच्या टप्प्यात बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक, शेतकरी, खरेदीदार व्यापाऱ्यांची गर्दी असते. मात्र गाळ्यांच्या पाकळ्यांत पडलेल्या घाणीतून चालण्यासाठी कसरत करावी लागते. यातूनच खरेदीदारांना, हमालांना मालाच ओझ घेऊन बाजारात फिराव लागत आहे. मात्र बाजार समिती आणि महानगरपालिका याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे.

समितीकडून दंडात्मक कारवाई नाही

गाळ्यांच्या समोर खराब फळे-भाजीपाला टाकला तर ठराविक दंड बाजार समितीने निश्चित केला आहे. बाजारात गाळ्यांच्या समोर मोठ्या प्रमाणावर खराब फळे भाजीपाला टाकला जातो. परंतु बाजार समितीकडून दंडात्मक कारवाई होत नसल्याने याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

- जिथे घाण तिथेच विक्री

- बाजारात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य

- नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

- अडत्यांही रस्त्यावर फळे-भाजीपाला टाकू नये

- बाजार समितीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज

फळ विभागात कांही गाळाधारक नासलेली फळे त्यांच्या गाळ्या समोर फेकून देतात असे निदर्शनास आलेले आहे. या बाबतीत या पूर्वी त्यांचे लेखी, तोंडी प्रबोधन केलेले आहे. असे प्रकार यापुढे आढळून आल्यास संबंधित आडत्यास GST सह रु 1180 दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT