पुणे

चाकणमध्ये लसणाच्या बाजारभावात तेजी

CD

चाकण, ता. १६ : चाकण येथील महात्मा फुले बाजारात शनिवारी (ता.१४) लसणाची ६० क्विंटल आवक झाली आहे. मागणी वाढल्याने लसणाच्या भावाला चांगलीच तेजी आली. लसणाला प्रतवारीनुसार प्रतिकिलोस किमान २०० ते कमाल ४०० रुपये बाजारभाव मिळाला. गावरान लसणास प्रतिकिलोला चारशे रुपये भाव आहे. ही भाववाढ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मोठी आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

येथील महात्मा फुले बाजारात मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात यांसह अन्य राज्यांतून व्यापारी लसूण विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. स्थानिक पातळीवर लसणाची उपलब्धता मर्यादित असल्याने इतर राज्यांतील आवकेवर चाकण बाजार अवलंबून आहे. चाकण बाजारात लसणाची खरेदी पिंपरी-चिंचवड, भोसरी, नवी मुंबई, कोकण या भागातील व्यापारी, खरेदीदार करत आहेत. सध्या लसणाला किरकोळ तसेच घाऊक व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी आहे.
दरम्यान, गृहिणींच्या स्वयंपाकघरातील तसेच हॉटेल, ढाब्यांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या लसणाचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे, हे मात्र वास्तव आहे.

हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, सर्वसामान्य ग्राहकांकडून लसणाची खरेदी सुरू आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ होत आहे. परराज्यांतून लसणाची आवक वाढते की कमीच राहते यावर बाजारभाव अवलंबून असणार आहे.
- रवींद्र बोराटे, व्यापारी, चाकण

दुष्काळाच्या परिस्थितीचा मोठा फटका
राज्यात दुष्काळाचे मोठ्या प्रमाणात सावट आहे. त्यामुळे लसणाची रब्बी हंगामातील लागवड कमी प्रमाणात होत आहे. रब्बी हंगामातील लागवड कमी प्रमाणात झाली तर लसणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात भाव वाढतील, अशी शक्यता खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027: ब्रेबॉर्न नाही, आता वानखेडेवर रंगणार फायनलसहित ११ सामने! BCCI चा मोठा निर्णय; पाहा खरं कारण काय?

Indian Ocean Geopolitics: हिंदी महासागराचा प्रवास – शांतिकडून संघर्षाकडे

‘नानांना पाठ दाबण्याचे दोन रुपये द्यायचो’; अशोक सराफांनी सांगितला भन्नाट किस्सा! म्हणाले...'भर कार्यक्रमात नानांनी पाठ दाबली'

Latest Marathi News Live Update : धुळ्यात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त 'जनजातीय गौरव दिन' उत्साहात संपन्न

Lek Ladki Yojana 2026 : लाडक्या लेकीच्या खात्यात मिळणार १ लाख १ हजार रुपये! सरकारने अर्जाचे नियम केले सोपे; आता घरबसल्या असा करा अर्ज!

SCROLL FOR NEXT