पुणे

वाघिरे महाविद्यालयात आठवणींना उजाळा

CD

ओतूर, ता. २५ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात शनिवारी (ता. २४) भूगोल विभागाकडून कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता, अशी माहिती भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. आमश्या पाडवी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी दिली.
प्रास्ताविकात डॉ. पाडवी यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते सद्यस्थितीपर्यंतचा आढावा घेऊन भूगोल विभागातील माजी विभागप्रमुख व त्यांचे सहकारी यांनी विभागात केलेल्या विकासात्मक प्रगतीचा मागोवा घेतला.
डॉ. कल्याण सोनावणे यांनी मेळावा आयोजित करण्यामागील हेतू सांगितला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उंब्रजचे पोलिस पाटील राहुल हांडे व बी.जे. कॉलेज आळेचे प्रा. डॉ. सुधीर तांबे, प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट व कला शाखेचे सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर माजी विद्यार्थ्यांकडून देखिल कला शाखेतील सर्व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राहुल हांडे यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला, शिक्षकांबद्दलचे प्रेम, महाविद्यालयातील शिस्त, गंमती जंमती, शिक्षकांची ज्ञानाची शिदोरी, किती टेन्शन आलं तरी चेहरा सतत हसरा ठेवण्यातच खरे जीवनाचे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सुधीर तांबे, गणेश गायकर, आशिष ठोंबरे, शांताराम बांगर, दिलीप शिंगोटे, दत्तात्रय बनकर, अशोक डोंगरे, सुदर्शन कांबळे, अक्षया डोंगरे, अविनाश हांडे आदींनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये कला शाखेचे प्राध्यापक डॉ. वसंत गावडे, डॉ. संदिपान गव्हाळे, डॉ. रमेश काशिदे, डॉ. राजेंद्र आंबवणे, डॉ. रोहिणी मदने, डॉ. जनार्दन नाडेकर, डॉ. नंदकिशोर उगले, डॉ. जितेंद्र घोडके, डॉ. अंकुश मोधे, डॉ. उमेशराज पनेरु, डॉ. निलेश हांडे व डॉ. योगेश्वर काळदंते यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन डॉ. निलेश काळे यांनी केले. तर आभार डॉ. रमेश गोपाळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT