हिंजवडी, ता.२६ : पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय संकटाचा जागतिक व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि व्यवसाय क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे उद्योगांनी केवळ कार्यक्षमतेवर भर न देता अनिश्चित परिस्थितीचा सामना करण्यासाठी धोरणात्मक लवचिकता आणि पर्यायी पुरवठा व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे, असा सूर सिम्बायोसिसच्या नेतृत्व व्याख्यानमालेत उमटला.
हिंजवडीतील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस येथे शुक्रवारी (ता.२१) ‘एसआयआयबी'' लीडरशिप सिरीज २०२६’चे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या संचालक प्रा. डॉ. अलका मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीएच्या विविध अभ्यासक्रमांतील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. सिम्बायोसिसच्या प्रिन्सिपल डायरेक्टर व इंटरनॅशनल विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी उद्घाटन केले.
संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे माजी राजदूत संजय सुधीर यांनी बदलत्या भूराजकीय परिस्थितीचे जागतिक बाजारपेठांवरील परिणाम स्पष्ट केले. ऊर्जा सुरक्षा, पर्यायी पुरवठा साखळी व अनिश्चिततेसाठी पूर्वनियोजनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
पहिल्या चर्चासत्रात सुएझ कालवा, लाल समुद्रातील वाहतूक अडथळे, वाहन उद्योगातील पुरवठा साखळी तसेच हवाई मालवाहतुकीवरील परिणामांवर चर्चा झाली. दुसऱ्या सत्रात भारतातील व्यवसायांवर पश्चिम आशिया संकटाचे परिणाम तपासण्यात आले. होर्मुझ सामुद्रधुनी, बाब-अल-मंदेब आणि सुएझ कालवा येथील अडथळ्यांमुळे वाहतूक, इंधन, विमा व व्यवसाय खर्च वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली. अक्षय ऊर्जा, सौरऊर्जा, बॅटरी ऊर्जा साठवणूक व्यवस्था आणि महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठा साखळीला भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी प्राधान्य देण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
WKD26A11705
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.