पुणे

आळे महाविद्यालयात ‘गझलकी दुनिया’ सादर

CD

आळेफाटा, ता. ९ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत डॉ. जयसिंग गाडेकर यांच्या ‘गझलकी दुनिया’ या विषयावरील व्याख्यान झाले. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना गझल म्हणजे काय, ती कशी तयार केली जाते तसेच आपल्या आयुष्यात गझलेचे महत्त्व काय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गझल या काव्यप्रकाराची रचना, छंद, काफिया-रदीफ यांची माहिती उदाहरणांसह स्पष्ट करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबतच विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. या व्याख्यानमालेतून उद्याचे लेखक, कवी, गीतकार आणि उद्योजक घडण्यासाठी प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. ही योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिःशाल मंडळाची असून विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या डॉ. अर्जुन पाडेकर यांनी डॉ. जयसिंग गाडेकर यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाभारतातील अर्जुनाप्रमाणे लक्ष्यावर एकाग्र राहून शिक्षणात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. यावेळी प्रा. थोरात सर्जेराव, प्रा. पुंडे विकास, प्रा. योगेश पाडेकर आदी उपस्थित होते. व्याख्यानाचे आयोजन इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अरुणा रवींद्र वाघोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. प्रा. अरविंद कुटे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक केले. तर, प्रा. अनुराधा वामन यांनी आभार प्रदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Investment Plans: महिलांना भविष्यात आर्थिक टेन्शन नको? मग या 7 ठिकाणी गुंतवणूक केली तर तयार होईल मोठा फंड

Ration Card: केंद्र-राज्य सरकारचा मोठा निर्णय! रेशनकार्डचे 'हे' ५ नियम बदलले; यादीतून नाव काढले जाणार? जाणून घ्या नवे निकष...

Viral Video : सुनील गावस्करांनी वचन पाळले, टीम इंडियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवसोबत 'झिंगाट' डान्स...

हाणामारी होण्याइतकं सलमान शाहरुखमध्ये झालेलं कडाक्याचं भांडण, अभिनेता स्वत: खुलासा करत म्हणाले... 'वादाचं मुख्य कारण....'

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्याचे तापमानाची 38 डिग्रीवर नोंद, नागरिकांची लाहीलाही

SCROLL FOR NEXT