पुणे

घेरडी गटावर आघाडीचा झेंडा; तिन्ही जागांवर मोठ्या फरकाने विजय

CD

लोगो : घेरडी जि.प. गट
---
SGW26B09285
संगीता मोटे
---
SGW26B09284
काजल काशीद
---
SGW26B09283
अशोक चोरमुले
---
गट अन्‌ गणांतील सर्व जागांवर आघाडीचा झेंडा
राजकीय रस्सीखेचनंतर निकाल स्पष्ट; ‘दोन मोटे’ संघर्षात शेकापच्या संगीता मोटे विजयी
दत्तात्रय खंडागळे : सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. १५ : तालुक्यातील घेरडी गट व संबंधित गणांतील निवडणुकीत आघाडीने तिन्ही जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. उमेदवारीच्या वाटपापासूनच या गटात मोठी राजकीय चुरस निर्माण झाली होती. मात्र निकाल लागल्यानंतर आघाडीची ताकद स्पष्ट झाली.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) राखीव असलेल्या घेरडी गटाची जागा आघाडीत शेतकरी कामगार पक्षाकडे आली होती. त्यामुळे माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील गटाचे अनिल मोटे यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले. शेकापकडून सोमा मोटे यांच्या पत्नी संगीता मोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. महायुतीकडून भाजपच्या आरती बुरुंगले मैदानात उतरल्या; मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते अनिल मोटे यांच्या पत्नी शुभांगी मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने. त्यामुळे ‘दोन मोटे’ यांच्यात थेट रस्सीखेच होणार, अशी चर्चा रंगली होती. या संघर्षात शेकापच्या संगीता मोटे यांनी विजय नोंदवत घेरडी गटावर शेकापचा झेंडा फडकावला.
निकालात संगीता मोटे यांनी १३ हजार ६६६ मते मिळवत ६ हजार ४६८ मतांच्या फरकाने विजय मिळवला. शुभांगी मोटे यांना ७ हजार १९८ मते मिळाली, तर आरती बुरुंगले यांना ३ हजार ४४३ मतांवर समाधान मानावे लागले. शेकाप कार्यकर्त्यांचे जाळे आणि साळुंखे- पाटील गटाचा मिळालेला पाठिंबा यामुळे आघाडीला मोठे यश मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
सोनंद गण सर्वसाधारण महिला राखीव होता. आघाडीकडून संभाव्य सभापतिपदाच्या उमेदवार म्हणून काजल काशीद यांचे नाव चर्चेत होते. महायुतीकडून शिवसेनेच्या सुषमा काशीद रिंगणात होत्या, तर वर्षा गवंड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने गणात रस्सीखेच निर्माण झाली. निकालात काजल काशीद यांनी ५ हजार ७३४ मते मिळवत ३ हजार १६९ मतांनी विजय संपादन केला. वर्षा गवंड (२,५६५ मते) यांनी दुसरे स्थान पटकावले, तर सुषमा काशीद (१,६६३ मते) तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. अपेक्षेप्रमाणे आघाडीने हा गणही आपल्या ताब्यात ठेवला.
घेरडी गण सर्वसाधारण असल्याने येथे तिरंगी लढत रंगली. आघाडीकडून अशोक चोरमुले यांनी ५ हजार ९७९ मते मिळवत विजय मिळवला. भाजपचे नवनाथ भोसले यांना ३ हजार ५९९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीनिवास खरे यांनी ३ हजार ५९६ मते मिळवत लक्षणीय कामगिरी केली. तिरंगी लढतीचा थेट फायदा चोरमुले यांना झाला आणि ते २ हजार ३८० मतांनी विजयी झाले.
---
आघाडीचे वर्चस्व कायम
घेरडी गटासह सोनंद व घेरडी या दोन्ही गणांमध्ये आघाडीने विजय मिळवल्याने स्थानिक राजकारणात आघाडीचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे. उमेदवारीच्या टप्प्यावर निर्माण झालेली अंतर्गत चुरस, संभाव्य बंडखोरी आणि तिरंगी लढतीची शक्यता यावर आघाडीने प्रभावी संघटनबांधणी व एकजूट दाखवत मात केली, असे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

मोठी बातमी! पोलिस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ महिन्यात; मैदानी चाचणी फेब्रुवारी-मार्चअखेर संपणार, लेखी परीक्षेसाठी १:१० उमेदवारांची निवड, वाचा...

SCROLL FOR NEXT