पुणे

तरुणीची प्रेम प्रकरणातून आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने दुसऱ्या तरुणीशी लग्न ठरविल्यामुळे संगणक अभियंता तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संगणक अभियंता तरुणास अटक केली.  

श्‍वेता अरुण बिश्‍वास (वय ३०, रा. निर्मला निवास, दस्तूर रोड, कॅम्प) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सचिन बबन कासिद (वय २९, स्वप्नलोक सोसायटी, फुरसुंगी) याला अटक केली आहे. श्‍वेता आणि सचिन हे शहरातील सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये संगणक अभियंता होते. ते दोघे काही वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये सचिनच्या फुरसुंगी येथील घरी राहात होते.  श्‍वेताला सचिनसमवेत लग्न करायचे होते. 

दरम्यान, मागील रविवारी सचिन हा बार्शीमधील त्याच्या मूळ गावी गेला. त्या वेळी त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी तिकडे एक मुलगी पाहिली. सचिनला ती मुलगी आवडल्याने त्याने तिच्यासमवेत लग्न करण्याचे ठरविले. त्यावरून श्‍वेता व सचिनचा वाद झाला. या सर्व प्रकारामुळे श्‍वेताला नैराश्‍य आले. 

याबाबत २६ फेब्रुवारीला आईला कॉल करून तिने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिने कॉल उचलला नव्हता. तिने २७ फेब्रुवारीला सचिनच्या फुरसुंगी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक के. एस. लोंढे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT