पुणे

Loksabha 2019 : २४ तासांत तीन जागा द्या; अन्यथा.. : राजू शेट्टींचा इशारा

सकाळवृत्तसेवा

पुणे -  भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला तर आम्ही आघाडीसोबत जायला तयार आहोत; परंतु हा निर्णय उद्यापर्यंत (बुधवार) घ्यावा, अन्यथा आमचा मार्ग मोकळा आहे, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीला मंगळवारी दिला. हातकणंगले, बुलडाणा व वर्धा या तीन जागांसाठी स्वाभिमानी ठाम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी या वेळी केला.

शेट्टी आणि रासपचे नेते महादेव जानकर यांची आज पुण्यात बैठक झाली. त्यानंतर शेतकरी संघटनेच्या सभासदांची बैठक शेट्टी यांनी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी यांनी हा अल्टिमेटम दिला. 

शेट्टी म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीने आमचे काही मुद्दे मान्य केले आहेत; परंतु आघाडीतील दोन्ही पक्षांनी ते मान्य केले पाहिजेत. तरच आम्ही आघाडीत जाण्याचा विचार करू. बुलडाण्याची जागा राष्ट्रवादीने सोडावी व वर्ध्याची जागा काँग्रेसने सोडावी, असा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे. माढ्याची जागा शरद पवार यांनी लढण्याची चर्चा आता संपुष्टात आल्याने तेथून आम्हाला संधी दिली, तर आम्ही लढायला तयार आहोत. कारण मागील निवडणुकीत तेथे आम्ही थेट राष्ट्रवादीशी लढत दिली होती. त्यात आमचा निसटता पराभव झाला होता. यामुळे जर ही जागा आम्हाला दिली तर आम्ही तयार आहोत. कारण आम्ही येथून सहज विजय मिळवू.’’

जानकर यांच्या भेटीबद्दल विचारले असता, शेट्टी म्हणाले, ‘‘छोट्या पक्षांना मोठ्या पक्षांकडून त्रास देण्याचे प्रयत्न होतच असतात. यामुळे जानकर युतीतून बाहेर पडले. आमचे आघाडीशी जुळले नाही, तर रासप व आम्ही एकत्र लढण्याचा विचार करू. आमची सोळा जणांची यादी तयार असून, आघाडीने सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही या सगळ्या जागा स्वतंत्रपणे लढायला सज्ज आहोत. केवळ भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही आघाडीकडे प्रस्ताव दिला असून, ते हा निर्णय सकारात्मकपणे घेतील, अशी अपेक्षा आहे.’’

आमची मागणी दोनच जागांची
हातकणंगलेची जागा ही आमचीच आहे. त्यामुळे आम्ही फक्त बुलडाणा व वर्धा या दोनच जागा मागत आहोत. बुलडाणा येथून रविकांत तुपकर व वर्ध्यातून सुबोध मोहिते निवडणूक लढवतील, असे शेट्टी यांनी सांगितले.  

शरद पवार यांनी राजकारणात पन्नास वर्षे घालवली आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय नक्कीच विचारपूर्वक असेल. निवडणूक हारण्याच्या भीतीने त्यांनी माढ्यातून माघार घेतली हे म्हणणे योग्य नाही.
-राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT