12Radhakrishnavikhe_Patil.jpg
12Radhakrishnavikhe_Patil.jpg 
पुणे

'भाजपमध्ये जा किंवा अपक्ष लढा' : कार्यकर्त्यांची विखे पाटलांकडे मागणी

सतीश वैजापूरकर

शिर्डी : नगर लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या आघाडीच्या तिढ्याबाबत आज प्रवरानगर येथे पार झालेल्या विखेप्रणीत जनसेवा मंडळाच्या बैठकीत राजकीय भूकंप घडविण्याचे संकेत देण्यात आले. 'जय श्रीराम'च्या घोषणा निनादल्या. ''राजकीय अन्याय होत असेल, तर सरळ भाजपची वाट धरा. अन्याय करणाऱ्यांना सोडचिठ्ठी देत, 1999 ची पुनरावृत्ती करा. विखे हाच पक्ष आहे. हे पुन्हा दाखवून द्या'', अशी मागणी कार्यकर्त्यांनी या बैठकीत जाहीरपणे केली. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांना सबुरीचा सल्ला दिला. पक्षाने न्याय दिला नाही, तर आपण कार्यकर्त्यांबरोबर राहू, असा सूचक इशारा द्यायला ते विसरले नाहीत. 

प्रवरानगर येथे आज झालेल्या या बैठकीस उत्तर नगर जिल्ह्यातील जनसेवा मंडळाचे सुमारे दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळ "शेजारून आडकाठी होत असेल आणि कॉंग्रेसकडून सन्मान मिळत नसेल, तर आपली ताकद दाखवून द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिर्डी दौऱ्यात विखे पाटील यांनी ''मला घरी आल्यासारखे वाटते'', असे विधान केले होते. आता 'त्या' घरी जाण्याचा निर्णय घ्या. एक तर भाजपमध्ये जा किंवा अपक्ष लढा,' अशा शब्दात या वेळी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ नेते रावसाहेब साबळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विखे कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
बैठकीची माहिती मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेवटच्या सत्रात हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. त्यांना सबुरीचा सल्ला दिला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनीही काही काळ या बैठकीस हजेरी लावली. डॉ. सुजय विखे पाटील मात्र या बैठकीस उपस्थित नव्हते. 

''या बैठकीत "जय श्रीराम'च्या घोषणा मी स्वतः दिल्या. कॉंग्रेसकडून अन्याय होत असेल, तर विखे पाटील यांनी भाजपमध्ये जावे, अशी मागणी मी, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते व युवा नेते अभय शेळके यांनी जाहीरपणे केली. अंतिम निर्णय विखे पाटील यांनी घ्यावा. तो जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल. असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.'' 
- विजय कोते, अध्यक्ष, साई निर्माण ग्रुप, शिर्डी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT