सद्गुरू गोदडनाथ महाराजांच्या
पादुकांचे फलटणमध्ये स्वागत
श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
आसू, ता. २७ : श्री संत सद्गुरू गोदडनाथ महाराज, कर्जत (जि. अहिल्यानगर) यांच्या सुमारे ११८ वर्षांनंतर दिव्य पादुकांचे फलटण येथे आगमन झाले असून, फलटणकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
येथील मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरात नाईक- निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने सुभद्राराजे नाईक- निंबाळकर यांनी स्वागत, पूजा, अभिषेक व आरती केली. त्यावेळी नाईक- निंबाळकर देवस्थानकडील मानकरी, सेवेकरी आणि भाविकांची उपस्थित होती.
श्री संत सद्गुरू गोदडनाथ महाराज देवस्थान, कर्जत येथील अभय पाटील, पंढरीनाथ काकडे, उदय काकडे, कुमार भोसले, रणजित नलवडे, सचिन सोनमाळी, अथर्व सोनमाळी, परशुराम क्षीरसागर यांच्यासह भक्तगण या पादुका घेऊन फलटण येथे आणल्या.
त्यानंतर पादुका पालखीमध्ये ठेवून मिरवणुकीने श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या. तेथे प्रभू श्रीराम सीतामाता लक्ष्मणाच्या मूर्ती समोर या पादुका ठेवून प्रभू श्रीराम सीतामाता आणि सद्गुरू गोदडनाथ महाराज यांची नाईक- निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट मान्यवर आणि कर्जत येथील मान्यवरांच्या हस्ते सेवा, पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर सदर पादुका मुधोजी मनमोहन राजवाड्यातील राजघराण्याच्या देवघरात ठेवण्यात आल्या.
आमदार रामराजे नाईक- निंबाळकर, रघुनाथराजे नाईक- निंबाळकर, संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्यासह घराण्यातील अन्य सदस्य कर्जत येथे सद्गुरू गोदडनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी जात असतात. सुमारे ११८ वर्षांनंतर सद्गुरू गोदडनाथ महाराज यांचे फलटण येथे आगमन झाल्यानंतर फलटणकरांनी स्वागत केले. या वेळी राजघराण्याच्या देवघराचे पुजारी शामराव राजाराम निकम, प्रभू श्रीरामाचे पुजारी योगेश पेटकर, पुरोहित राजीव देशपांडे, नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटी ट्रस्टचे व्यवस्थापक दशरथ यादव, बाबा सूर्यवंशी, भाविक महेंद्र जयवंतराव ढवळे, डॉ. सागर निकम, सौ. सविता कापडी यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.
-------------------------------
02547
फलटण : मुधोजी मनमोहन राजवाड्यातील देवघरात सद्गुरू गोदडनाथ महाराज यांच्या पादुकाची आरती करताना सुभद्राराजे नाईक- निंबाळकर, समवेत नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज ट्रस्टचे पदाधिकारी.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.