पुणे

पुणे : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दूध घेऊन घरी येत असताना दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना रविवारी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील ओशियन पार्क सोसायटीच्या परिसरात घडली. 

याप्रकरणी कमल झुंबरलाल बाफना (वय 74 , रा. कात्रज ) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाफना या नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी त्यांच्या सोसायटीजवळील डेअरीमधून दूध आणण्यासाठी गेल्या होत्या.

दूध घेऊन त्या परत येत होत्या. त्याचवेळी दुचाकीवरुन दोघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. फिर्यादी पत्ता सांगत असतानाच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 36 हजार रुपये किंमतीची सोनसाखळी जबरदस्तीने चोरुन नेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT