वडगाव शेरी - गोल्डन सर्कस सुरू नसल्याने रिकामे बसलेले कलाकार व कामगार.
वडगाव शेरी - गोल्डन सर्कस सुरू नसल्याने रिकामे बसलेले कलाकार व कामगार. 
पुणे

भावकीच्या भांडणाचा सर्कसचालकाला फटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वडगाव शेरी येथे भावकीच्या भांडणात सर्कसचालकावर दिवाळखोरीत जाण्याची वेळ आली आहे. या सर्कसला संबंधित जागेवर परवानगी देऊ नये यासाठी राजकीय दबाव आणल्याचा आरोप होत आहे. यामुळे दोन आठवड्यांपासून सर्कस सुरू होऊ न शकल्याने १२० कलाकार व २५ प्राण्यांवर लाखो रुपये खर्च झाल्याने सर्कसचालक मेटाकुटीला आला आहे.

वडगाव शेरी येथे ट्रंप टॉवरसमोर सतीश मुळीक यांच्या मोकळ्या जागेवर २ ऑगस्टपासून गोल्डन सर्कस सुरू होणार होती. पण सर्कसच्या तंबूसाठी परवानगी घेतली नाही म्हणून पालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजावली. यापूर्वी शहरात कुठेही सर्कससाठी पालिकेच्या परवानगीकरिता अडविण्यात आलेले नसल्याचे सर्कसचालक अमोल शेवडे व उमेश आगाशे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर ही जागा आमदार जगदीश मुळीक यांच्या भावकीतील ॲड. सतीश मुळीक यांची आहे. त्यांच्यात वाद असल्याने परवानगीचा ससेमिरा सुरू झाला. सर्कसचालकाने अर्ज करून, सर्व एनओसी आणूनदेखील परवानगी मिळत नव्हती. याबाबत भाजपच्या शहरातील नेत्यांकडे तक्रार केली, पण त्यांनी काही केले नाही. सर्व कागदपत्र व्यवस्थित असल्याने बांधकाम विभागाने आठ दिवसांपूर्वी त्यास मान्यता दिली, पण आयुक्तांची शेवटची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. शेवडे म्हणाले, ‘‘सर्कस सुरू करण्यासाठी आम्ही सर्वांच्या एनओसी आणल्या. पण राजकीय दबावापोटी पालिकेची मान्यता मिळत नाही. रोजचा खर्च मात्र ९० हजार रुपये असल्याने मी दिवाळखोरीत जाईन.’’ 

ॲड. मुळीक म्हणाले, ‘‘उच्च न्यायालयाने या जागेवर महापालिका अडवणूक करू शकत नाही असे आदेश दिले आहेत. पण मी विधानसभेला प्रचार केला नाही म्हणून मला आमदरांकडून त्रास दिला जात आहे.’’ 

दरम्यान, बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सर्कसला परवानगी देऊ नये यासाठी दबाव आणला जात आहे. तरी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला आहे, असे सांगितले. आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT